आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ महोत्सव होणार; जानेवारी किंवा फेब्रुवारीचा मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यंदाचा वेरूळ महोत्सव रद्द झाल्याच्या बातम्यांमुळे रसभंग झालेल्या रसिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. हा महोत्सव रद्द झाला नसून डिसेंबरऐवजी तो जानेवारी किंवा फेब्रुवारीत होऊ शकतो, असा दावा जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केला. त्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांच्या अदाकारीचा नजराणा स्थानिकांना मिळण्याच्या अपेक्षा अजून तरी कायम आहेत.
हा महोत्सव रद्द होणार असल्याची बातमी गेल्या आठवड्यात झळकली होती. तेव्हा विक्रमकुमार सुटीवर होते. काल ते रुजू झाले. आज पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, हा महोत्सव रद्द झालेला नाही. आमची तयारी सुरू आहे. कलाकारांच्या तारखा मिळवणे आणि अन्य बाबींवर आमचे काम सुरू असून तारखा निश्चित झाल्यानंतर महोत्सवाची तारीख जाहीर केली जाईल.