आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ महोत्सवाचा उद्देश आणि वैभवही हरवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सांस्कृतिक वैभवामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे असते. देशोदेशीच्या पर्यटकांना महोत्सवाच्या निमित्ताने या समृद्ध संस्कृतचे दर्शन घडावे या उद्देशाने वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची पायाभरणी झाली. मात्र, यंदाच्या फिल्मी गीतांच्या कार्यक्रमामुळे तसेच नियोजनाच्या अभावामुळे या महोत्सवाचा उद्देशच तर हरवलाच शिवाय वैभवही हिरावले गेले. ज्यांच्या उपस्थितीशिवाय शहरातील सोहळे पूर्ण होत नाहीत, अशा संगीत-नृत्य सेवेला आयुष्य वाहिलेल्या कलावंतांनी महोत्सवाकडे पाठ फिरवली. त्यांना साधे निमंत्रणही आयोजकांनी दिले नव्हते, असे समोर आले आहे.
जाण्याची इच्छा झाली नाही : सचिन नेवपूरकर
शास्त्रीयआणि लोककलांचा परिचय पर्यटकांना व्हावा या दृष्टीने सादरीकरणांची निवड व्हायला हवी होती. ज्या कलावंतांचे प्रमोशन झी किंवा इतर वाहिन्या करतात, त्यांचेच प्रमाेशन शासनानेही केले. याशिवाय तिकिटाच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नव्हत्या. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात गाणे मानाचे ठरते. कारण या महोत्सवाचे अभिजातपण जपले गेले. मात्र, वेरूळ महोत्सव आंतरराष्ट्रीय शब्द लिहिल्याने मोठा झाला नाही तर सादरीकरणांमुळे खालच्या पातळीवर गेला. त्यामुळे तेथे जाण्याची इच्छाही झाली नाही.
फिल्मी कार्यक्रमांना जात नाही : व्ही. सौम्याश्री

महोत्सवातीलकार्यक्रमांचा दर्जा घसरला आहे. कार्यक्रमांच्या निवड प्रक्रियेबाबत शहरातील कलावंतांना सहभागीही करून घेतले नाही. फिल्मी कार्यक्रमात आम्ही जात नाहीत. फक्त पहिल्या दिवशी शास्त्रीय कार्यक्रमाला गेले होते. पुढील दोन दिवसांचे आयोजन महोत्सवाची उंची कमी करणारे होते. जो सोहळा टीव्हीवर पाहता येतो तो इतके पैसे खर्च करून औरंगाबादमध्ये का पाहावा. आज मी दिल्लीत महोत्सवात सादरीकरणासाठी आले आहे. पण, आपल्या शहरात विचारणाही झाली नाही, हीच खंत.

उंची कमी करणारे आयोजन : पं. नेरळकर
पं.नाथराव नेरळकर म्हणाले की, वर्षांच्या खंडाने महोत्सव झाला. त्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या होत्या. यापूर्वीच्या प्रत्येक महोत्सवात शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्याचे कार्यक्रम झाले. सुगम संगीताचाही आस्वाद रसिकांनी घेतला. मात्र, यंदा फिल्मी गाण्यांचा झळाळता सोहळा महोत्सवाची उंची कमी करणारा ठरला. फिल्मी गाण्यांसाठी वर्षभर विविध सोहळे आयोजित केले जातात. पण महोत्सवाचे वेगळेपण हे अभिजात शास्त्रीय संगीत हेच होते. कोट्यवधी रुपये खर्चून आणलेल्या कलावंतांनी सीडीवर गाणी चालवल्याचेही पुढे आले.
बातम्या आणखी आहेत...