आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन स्थळाच्या रुग्णालयात कर्मचारीच नाही; प्रसुती माता, पोलिस अधिकारी पाहाताहेत वाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ येथील रुग्णालयातील गैरसोयी जाणून घेताना पोलिस निरीक्षक भुजंग. (छाया- वैभव किरगत) - Divya Marathi
वेरूळ येथील रुग्णालयातील गैरसोयी जाणून घेताना पोलिस निरीक्षक भुजंग. (छाया- वैभव किरगत)
 
वेरुळ - जगप्रसिद्ध, ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारीच नाहीत. मोजक्या कर्मचाऱ्यांवर कामे सुरू असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची दमछाक होत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रसूती झालेल्या मातेसह बाळाला आणि पोलीस प्रशासनास याचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे.

पोलिसांना प्रत्यक्ष अनुभव
गल्लेबोरगाव येथे दुपारी दोन दुचाकीचा झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले. यातील मृतदेह पुढील तपासासाठी पोलिसांनी वेरुळ येथील आरोग्य केंद्रात आणले. त्यावेळी एकही कर्मचारी उलब्ध नव्हता. पोलिसांनी कर्मचाऱ्यांना आणि वैद्यकिय अधिकाऱ्यांना दुरध्वनीद्वारे संपर्क साधला. तरीही कित्येक तास त्यांची वाट पाहत बसावे लागले. एकेकाळी डॉक्टर आनंदी बाई जोशी पुरस्काराने सन्मानित झालेल्या व कागदोपत्री आय.एस.ओ. असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ शोभेची वस्तू बनले आहे.

खेड्यांतून आलेल्यांचीही घोर निराशा
वेरुळ येथे पर्यटक भाविकांची कायमच वर्दळ असते. प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत परिसरातील अनेक खेड्यातील गरीब जनतेला हक्काची आरोग्य सेवा मिळत नसल्याने येथे येवून रुगणांची निराशा होत आहे. ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळावी म्हणून प्रथामिक आरोग्य केंद्रावर आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. परंतू येथील अधिकारी व कर्मचारी वारंवार गैरहजर असतात.

प्रसूती झालेल्या मातेसाठी डॉक्टर नाहीत
वेरुळच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी रात्रीच्या वेळी उपस्थित नसल्याने परिचारिकांच प्रसूतीची कामे करतात. त्याचाच प्रत्यय म्हणून पळसगाव येथील मनीषा भगवान बारगळ या महिलेला व तिच्या वृद्ध आईला आला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्या वेरुळच्या आरोग्य केंद्रात दाखल झाल्या होत्या. तेथे डॉक्टर व औषध निर्माण अधिकारी उपलब्ध नव्हते. वेळेवर फक्त आरोग्य सेविका मिनल कोंबले ह्या उपस्थित असल्याने त्यांनी सदरील महिलेची प्रसूती एकट्याने केली. मातेचे व बाळाचे प्राण वाचवले. मात्र, शनिवार व रविवारी या दोन दिवसांत डॉक्टरांनी या रुग्णांकडे फिरूनही पाहिले नाही. स्वच्छतेवर एवढे दुर्लक्ष केले जाते, की रुगणालयात मोकाट कुत्र्यांचा वावर ही रोजची बाब बनली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...पर्यटन स्थळाच्या रुग्णालयाची अवस्था..
बातम्या आणखी आहेत...