आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन हजारांवर भाविक वेरूळच्या शिवालय तीर्थावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - जनार्दन स्वामी महाराज यांच्या परंपरेतील वार्षिक अक्षय्य तृतीया सोहळ्याची सांगता रविवारी झाली. कार्यक्रमासाठी साडेतीन हजारांवर भाविकांची उपस्थिती होती. या वेळी स्वामी शांतीगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. आठ दिवस चाललेल्या या सोहळ्यात अनुष्ठान, महिला जप, पंचकुंडात्मक महायज्ञ यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे अायोजन करण्यात आले होेते. सांगतेपूर्वी जनार्दन स्वामींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पादुकांचे पूजन करण्यात आले. नर्मदा परिक्रमा करून परतलेल्या शेकडो महिलांना खासदार खैरे यांच्या वतीने वस्त्रदान करण्यात आले.

उत्सवाची सांगता
शिवालयतीर्थावर रविवारी अक्षय्य तृतीया सोहळ्याची रविवारी दुपारी सांगता झाली. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
पादुका पूजन
वेरूळयेथील शिवालय तीर्थावर जनार्दन स्वामी महाराज यांच्या पादुकांचे पूजन करून मिरवणूक काढून उत्सवाची सांगता करण्यात आली. छाया : वैभव किरगत
बातम्या आणखी आहेत...