आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना गंडा घालणाऱ्या महिलांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत चार बेरोजगारांना १६ लाखांना गंडवणाऱ्या पुण्याच्या कविता डॉमनिक मारियन-पुजारी आणि जसिंता इग्नोशियस फ्रान्सिस या दोघींना क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एच. शेख यांच्यासमोर हजर करण्यात आले असता त्यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले.

पुण्यातील देहू रोड येथील ऑर्डनन्स फॅक्ट्रीत लिपिक पदाची भरती होणार असून नोकरीसाठी लाख रुपये लागतात; मात्र ओळखीमुळे लाख रुपयांत काम होणार असल्याचे डिसेंबर २०१३ मध्ये योगेश रतन वाणी (रा. गारखेडा) याने आशिष बिनोरकर (रा. सुदर्शन हौसिंग सोसायटी) याच्या वडिलांना सांगितले. योगेशवर विश्वास ठेवून आशिषच्या वडिलांनी त्याला पुणे येथे कविता मारियन-पुजारी (रा. हिजेवाडी रोड, सेलीन पार्क, पुणे) आणि जस्टिन पीटर फ्रान्सिस (रा. फातेमानगर, हडपसर, पुणे) यांच्याकडे पाठवले. या महिलांना भेटून आशिष परत आला. नंतर फ्रान्सिसच्या सांगण्यानुसार त्याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात (क्रमांक ६८००२७३६५७०) औरंगाबादेतील सिंडिकेट बँकेच्या बचत खात्यातून (क्रमांक ५१३०२२१०००५८९९) चार लाख रुपये ३० जानेवारी २०१४ रोजी वर्ग केले.
त्यानंतर आशिषच्या अन्य चार नातेवाइकांनीही प्रत्येकी चार लाख रुपये नोकरीसाठी भरले. वर्ष उलटले तरी नोकरीची आॅर्डर आल्यामुळे फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. क्रांती चौक पोलिसांनी त्या दोन महिलांना अटक केली. मात्र, त्यांनी तपासात सहकार्य केले नाही.

दोघींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
पोलिसकोठडी संपल्यामुळे मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपास पूर्ण झाला नाही, त्याच्या ताब्यातून १६ लाख रुपये जप्त करायचे आहे, तसेच त्यांनी तपासात सहकार्य केलेले नाही, त्यामुळे पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती तपास अधिकाऱ्यांनी केली असता न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.