आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Employment Guarantee Scam News In Marathi, Arresting, Crime

80 लाख रुपयांचा रोहयो घोटाळा उघड, दहा जणांविरूध्‍द गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोड - रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये गैरव्यवहार करून लाखोंचा अपहार केल्याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात बुधवारी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घोटाळ्यात पैठण पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी पी. बी. काकडे, पारुंडी तांडाचे सरपंच बाजीराव राठोड, पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता के. एस. शिंदे, तत्कालीन कनिष्ठ अभियंता डी. सी. फणसे, शाखा अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, पारुंडीचे ग्रामसेवक एस. एस. वावरे, ग्रामसेवक एस. बी. पाटील, ग्रामसेवक के. पी. गव्हाणे, ग्रामरोजगार सेवक सुधाकर राठोड, पोस्टमास्तर इन्तेरवार (बाबू) शेख या सर्वांनी संगनमत करून शासनाच्या महात्मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील कामात ऑनलाइन बनावट जॉबकार्ड, हजेरीपट बनवून शासनाची व गावातील लोकांची फसवणूक करून सरकारी योजनेचा गैरवापर करून एकूण 79 लाख 53 हजार 613 रुपयांचा गैरव्यवहार करून अपहार केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोषी ठरवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाला दिले.
पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथे मनरेगाअंतर्गत सन 2006 मध्ये रोजगार हमी योजनेच्या मातीनाला, सिमेंट नाला बांध, रोपवाटिका, शेततळे, बाहेरगावचे मजूर दाखवणे, बोगस जॉबकार्ड तयार करणे आदी कामांत घोटाळा करून शासनाच्या योजनेचा 79 लाख 53हजार 613 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार पैठण पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी, सरपंच, कनिष्ठ अभियंत्यासह एकूण दहा जणांविरोधात पाचोड (ता. पैठण) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.विस्तार अधिकारी गोरखनाथ पवार यांनी पाचोड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पारुंडी तांडा (ता. पैठण) ग्रामपंचायतमध्ये मनरेगाअंतर्गत सन 2006 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत 35 मातीनाला बांध, 2 सिमेंट नाला बांध, 2 रोपवाटिका, 3 शेततळे अशा एकूण 42 कामांना विविध स्तरांवरून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे; परंतु या कामात प्रत्यक्षात बोगसपणा जाणवल्याचे पाहून डॉ. अरुण राठोड, कल्याण राठोड यांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच तक्रारदार सरपंच व ग्रामसेवकांचे जबाब नोंदवण्यात आले. शिवाय तक्रारीतील सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यामध्ये 24 कुटुंबांतील 57 व्यक्तींची तब्बल चार वेळेस जॉबकार्डसाठी ऑनलाइन नोंदणी केल्याचे निदर्शनास आले.


35 मातीनाला बांधांपैकी केवळ दहाच कामे पूर्ण
पैठण तालुक्यातील पारूंडी तांडा येथे 35 मातीनाला बांधांपैकी केवळ 10 माती बांधांची कामे प्रत्यक्षात झाल्याचे आढळले. 25 मातीनाला बांध प्रशासकीय मान्यता गटात आढळून आलेले नाहीत, तर मंजूर दोन रोपवाटिकांपैकी एक व तीन शेततळ्यांपैकी एकही शेततळे आढळले नाही. यावरून रोपवाटिकेचे 11 हजार 808 रुपये, शेततळ्यांचे 52 हजार 737 रुपये, मातीनाला बांध व सिमेंट नाला बांधकामाचे 78 लाख 89 हजार 073 रुपये असा एकूण 79 लाख 53 हजार 613 रुपयांचा सन 2006 पासून आजपर्यंत वेळोवेळी गैरव्यवहार करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले आहे.


‘केंद्रात सत्ता मिळवण्याचे दावे करणा-या भाजपमधील नेत्यांमध्ये आपसातच वैमनस्य आहे. पक्षात विश्वासाचा अभाव असून गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आपल्याला विजयी होऊ देणार नाहीत, म्हणून लालकृष्ण अडवाणींनी भोपाळमधून उमदेवारी मागितली. ज्या पक्षातील नेत्यांना एकमेकांचा विश्वास नाही, असा भाजप संपूर्ण देशाचा विश्वास कसा मिळवणार,’ असा टोला संघवी यांनी लगावला.