आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Enable Self Women Is Powerfull Vaijayanti Khaire

स्वयंसहायता गटांमुळे महिला बनताहेत सक्षम :वैजयंती खैरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिला चूल व मूल सांभाळून बचत गटांच्या माध्यमातून बँकेशी व्यवहार करून आपल्या संसाराला हातभार लावत सक्षम बनत आहेत, असे गौरवोद्गार वैजयंती खैरे यांनी काढले. त्या औरंगाबाद जिल्हा आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी बोलत होत्या.
या वेळी आशा दातार, नगरसेवक विजय औताडे, सहकाररत्न ए. ए. मानकापे पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस. बोरुडे, व्यवस्थापक डी.एस. अधाने, उपाध्यक्ष सविता अधाने, शशिप्रभा राव, अनिता पाटील आदी उपस्थित होते. त्या म्हणाल्या की, महिला वेगवेगळे पदार्थ, वस्तू बनवतात; परंतु त्या वस्तू कशा विकाव्यात असा मोठा प्रश्न त्यंाच्यापुढे उभा असतो. तो आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया, असे सांगून त्यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मागील सभेचे इतिवृत्त ज्योती लहाने यांनी वाचून दाखवले. ए. ए. मानकापे म्हणाले की, बचत गटातील महिलांनी केवळ कर्ज हेच उद्दिष्ट न ठेवता बचत करणे व समाजकार्यात सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. या सभेला नलिनी बाहेती, सिंधू इंगळे, सुनंदा मोगल, रेणुका मोगल, शोभा कदम, रश्मी ढापरे, विलास चिंतामणी, बळीराम नाचन, जयश्री सोनटक्के, शोभा नाईक, मीनाक्षी कुमावत, उषा शिंदे आदी उपस्थित होते.