आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमित १८ एकर जमीन अखेर लष्कराच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रशासनाच्या मालकीची औरंगाबाद छावणी परिषदेतील हेक्टर ८२ आर अतिक्रमित जमीन गुरुवारी लष्कराने ताब्यात घेतली. अनेक वर्षांपासून या जमिनीवर प्रकाश काळे या शेतकऱ्याचा कब्जा होता. न्यायालयाच्या निकालाआधारे गुरुवारी रक्षा भूमी संपदा अधिकारी डी. एन. यादव यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवून जमीन ताब्यात घेण्यात आली. उर्वरित तीन जमिनी जीलएआर क्रमांक २१४, १२९, १९२ शुक्रवारी ताब्यात घेण्यात येणार आहेत. संरक्षण विभागाच्या रक्षा भूमीअंतर्गत येणाऱ्या छावणी परिषदेच्या गोलवाडी शिवारातील जीएलआर सर्व्हे नंबर २१८ येथील हेक्टर ८२ आर जमीन अनेक वर्षांपासून प्रकाश बाबूराव काळे यांच्या ताब्यात होती. ही जमीन केंद्राच्या रक्षा भूमीची नसून १६ डिसेंबर १९७४ मध्ये अब्दुल रहेमान मियाजी यांच्याकडून ९९ वर्षांच्या ठोकापत्राआधारे कसण्यासाठी घेतल्याचा दावा काळे यांनी न्यायालयात केला होता. तसेच जमीन कसण्यास छावणी परिषेदकडून अडथळा होत असल्याचे अपिलात मांडण्यात आले होते. त्यावर रक्षा भूमी कार्यालय छावणी परिषदचे वकील ॲड. संदीप बी. राजेभोसले यांनी युक्तिवाद केला की, ही जमीन संरक्षण विभागाची असून केंद्र सरकारच्या मालकीची आहे. नोंदणी कायदा १९०८चे कलम १७ नुसार मालमत्ता हस्तांतर कायदा १८८२ चे कलम १०७ नुसार या शेतजमिनीचे ठोकपत्र हे एका वर्षापेक्षा अधिक कालावधीचे असल्यामुळे अब्दुल रहेमान मियाजी प्रकाश काळे यांनी ठोकापत्र नोंदणीकृत करणे बंधनकारक होते. परंतु काळे यांनी न्यायालयात सादर केलेले ठोकापत्र नोंदणीकृत नव्हते. त्यामुळे काळे याचे अपील फेटाळावे, असा युक्तिवाद राजेभोसले यांनी केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तिसरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस.डी. निकम यांनी काळे यांचे अपील नांमजूर केले होते.
वृक्षलागवड केली

रक्षासंपदा अधिकारी डी. एन. यादव, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर, रक्षा भूमी उपविभागीय अधिकारी हर्षद क्षीसागर, छावणी परिषदेचे सहायक अभियंता उमेश वाघमारे, तसेच केंद्र शासनाचे अतिरिक्त विधी सल्लागार ॲड. संदीप बी. राजेभोसले कर्नल आर. शर्मा, छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आरिफ शेख, मिलिटरीचा क्यूआरटी फोर्स आदींनी गुरुवारी अतिक्रमण हटवून वृक्ष लागवड करत जमीन ताब्यात घेतली.
जून महिन्यातच

बजावली नोटीस
न्यायालयाच्या निकालानुसार रक्षा भूमी संपादन कार्यालयाकडून प्रकाश काळे यांना जूनमध्येच जमिनीवरील ताबा सोडण्याचे नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, अतिक्रमण हटवल्यामुळे गुरुवारी जमीन ताब्यात घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...