आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत कोट्यवधीच्या जागेवर व्यावसायिकाचे अतिक्रमण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''सिडको आणि एका सोसायटीच्या टोलवाटोलवीमुळे सिडकोच्या एका मोकळ्या भूखंडाचा वर्षानुवर्षे गैरवापर होत आहे. अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून एकाने खोटी कागदपत्रे सादर केली व हा भूखंड हडपला. निवासी भाग असूनही या जागेवर बार थाटला. एवढेच नव्हे, तर उर्वरित जागा परस्पर एका बँकेला भाड्याने दिली; पण सिडको मात्र 18 वर्षांपासून या अतिक्रमणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. अधिकार्‍यांचा छुपा आशीर्वाद असल्यानेच या माणसाने आजच्या बाजारभावाप्रमाणे तब्बल सव्वा कोटीच्या जागेवर कब्जा केला आहे.''

सिडकोतील जेएनईसी कॉलेज व चिश्तिया कॉलनीसमोरील जागेचे हे प्रकरण आहे. व्यावसायिक असलेले विजय देशमुख यांनी सिडकोच्या निवासी भूखंडाचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर करून निवासी भागात रसोई या नावाने एक बार उघडला. त्याच्या बाजूच्या रिकाम्या जागेत भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट को-आपरेटिव्ह सोसायटी ही बँक सुरू झाली आहे. सिडकोने ही जागा आमची असून तिचा कर्मशियल वापर करू नये, अशी नोटीस बँकेला पाठवली. शिवज्योती सोसायटीचाही बँकेवर आक्षेप आहे. सिडको अधिकार्‍यांचा छुपा पाठिंबा मिळत असल्याने दिखाव्याची कारवाई करत हे प्रकरण दडपले गेले आहे.

बनावट कागदपत्रे जोडली
डीबी स्टारने या प्रकरणाचा महिनाभर तपास केला. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणाची उकल झाली तेव्हा विजय देशमुख यांनी हा भूखंड व्यावसायिक असल्याच्या खोट्या सह्या केल्याचे पुढे आले. सोसायटीचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांनीही आपल्या खोट्या सह्या देशमुख यांनी केल्याचा आरोप केला आहे. निवासी भूखंडाचे आरक्षणच विजय देशमुख यांनी बदलून टाकल्याचे यातून निष्पन्न झाले. मुळात ही जागा सध्या सिडकोची आहे. त्यामुळे भूखंडाचे आरक्षण सोसायटीही बदलू शकत नाही. परंतु, सिडकोचे अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.

सिडकोचे नरोवा कुंजरोवा
माहितीच्या अधिकारात दिलेल्या एका पत्रात एकीकडे ही जागा आमच्या मालकीची असल्याचे सिडको म्हणते, तर दुसरीकडे या जागेवरील अतिक्रमण काढण्याचे काम सोसायटीचे असल्याचे म्हणते. विजय देशमुख यांची जागा वैध की अवैध, या प्रश्नावर सिडकोचे प्रशासक सुधाकर तेलंग यांनी ‘ते आत्ताच सांगता येणार नाही. पार्टली वैध आणि पार्टली अवैध म्हणता येईल, पूर्णपणे अवैध म्हणता येणार नाही’, अशी उत्तरे दिली. आणखी खोलात जाऊन विचारले असता ते म्हणाले, मला पुन्हा एकदा सर्व कागदपत्रे वाचावी लागतील. सिडकोच्या किती जागांवर अतिक्रमण झाले आहे त्याचीही माहिती त्यांनी दिली नाही. मात्र, देशमुख यांचे अतिक्रमण असल्याचे त्यांनी मान्य केले.

या प्रकरणाचा पिच्छा पुरवत विजय देशमुख यांचे भाऊ विकास देशमुख यांनी महसूलमंत्री आणि पालकमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. विजय देशमुख यांनी खोटी कागदपत्रे तयार करून जागेचे बदलेले आरक्षणही त्यानी कागदपत्रांसह प्रशासनाकडे पाठवले आहे. त्यानंतर मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत विजय देशमुख यांची चौकशी करण्याचे आदेश प्रशासकांना दिले. त्यावर अनेक सुनावण्या झाल्या, पण सिडकोच्या अधिकार्‍यांनी कोणताच निर्णय दिला नाही.

सिडकोच्या अधिकार्‍यांची दाबादाबी
या प्रकरणाचा खोलात तपास करताना अनेक वेळा डीबी स्टार चमूला सिडको कार्यालयासह या बातमीशी संबंधित अनेकांना भेटावे लागले.त्यावेळी सिडको अधिकारी संबंधितांना माहिती देत होते. शिवाय सोसायटीच्या सभासदांना आपण डीबी स्टारकडे का गेला, असा सवालही केला.

या विषयाची कागदपत्रे आली
या सर्व प्रकरणाची कागदपत्रे माझ्याकडे आली आहेत, पण मला बोलण्याचा अधिकार नाही. प्रशासक सुधाकर तेलंग हेच याबाबत माहिती देऊ शकतील. माझे काम कागदपत्रे तपासण्याचे आहे व ते मी करीत आहे.
-जे.टी.साटोटे, सहा.मालमत्ता अधिकारी सिडको

शिवज्योती सोसायटीचा वाद
सिडकोतील जेएनईसी कॉलेजसमोर जकात नाका व चिश्तिया कॉलनीच्या मधोमध 18 हजार 885 हजार चौरस मीटर जागेवर शिवज्योती कॉलनी वसलेली आहे. 1964 मध्ये ही गृहनिर्माण संस्था निर्माण झाली. संस्थेने सिडकोच्या आधी ही जागा घेतली, नंतर सिडको प्रशासन आल्याने कॉलनीभोवतालची 7 हजार चौ.मी. जागा त्यांना पाहिजे होती. त्यासाठी संस्थेन सिडकोकडे अर्ज केला. सोसायटीने मान्यतेनुसार नवीन सभासद करून घेतले. या 7 हजार चौ.मी जागेपैकी 3 हजार चै.मी. जागेवर चिश्तिया कॉलनीसह इतर काही लोकांनी अतिक्रमण केले. याची तक्रार सोसायटीने केली, परंतु सिडकोने दखल घेतली नाही. जागेचे 9 लाख 8 हजार रुपये भरले, पण जागा त्याब्यात घेतल्यावर शिवज्योती गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या लक्षात आले की आपल्याला सिडकोच्या अधिकार्‍यांनी 7 हजार चौ.मी. जागा देतो असे सांगितले पण प्रत्यक्षात 4 हजार चौ.मी. जागाच दिल्याचे सोसायटीचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही सिडकोच्या अधिकार्‍यांनी दाद न दिल्याने अखेर न्यायालयात धाव घेतली. खालच्या न्यायालयात सिडकोच्या बाजूने निकाल लागला. त्याला परत नागरिकांनी खंडपीठात आव्हान दिले. या दरम्यान सिडकोने या जागेचा सौदाच रद्दबातल ठरवला. त्यामुळे या कॉलनीतील 32 पेक्षा जास्त घरांचे बांधकाम अवैध ठरले. त्यामुळे गेल्या 25 वर्षापासून नागरिक हैराण आहेत.

न्याय द्या, केस मागे घेतो
आम्हीच सिडकोच्याविरोधात खंडपीठात अपील केले आहे. कारण 7 हजार चै.मी. पैकी फक्त 4 हजार चौ.मी. एवढीच जागा त्यांनी आम्हाला दिली पैसे मात्र 7 हजार चौ.मी. जागेचे घेतले. म्हणून आम्ही सिडकोच्या विरोधात न्यायालयात गेलो. अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनाही भेटलो. त्यांनी प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले तरी काहीही झाले नाही. सिडकोने हे प्रकरण निकाली काढावे, अशी आमची मागणी आहे.
-जे. बी. जाधव, सचिव, शिवज्योती कॉलनी

> शिवज्योती सोसायटीचा प्रश्न निकाली का निघत नाही?
सोसायटीच आमच्याविरोधात न्यायालयात गेली आहे.
> ते केस मागे घ्यायला तयार आहेत.
त्यांनी प्रारंभी पैसे भरायला उशीर केला. ही बाब 1986 सालची आहे. म्हणून आम्ही 1994 मध्ये नोटीस पाठवून त्यांना दिलेल्या 7 हजार चै.मी. जागेचे अलॉटमेंट रद्द केले. नंतर त्यांनी न्यायालयात पैसे भरले. सिडकोकडे काही रक्कम भरली. प्रत्येक वेळी नवीन बाजारभावाने पैसे भरण्यास ते तयार होत नाहीत. म्हणून विलंब होतोय. त्यांनी केस मागे घेतली तर धोरणात्मक निर्णय घेऊन हे प्रकरण निकाली काढता येईल.
> विजय देशमुख यांनी सोसायटीत बार व बँकेला जागा दिली, हे योग्य आहे काय.
या जागेचा व्यापारी तत्त्वावर वापर करता येत नाही. त्यांना सोसायटीने परवानगी दिली असावी.
> सोसायटी म्हणते आम्ही परवानगी दिली नाही.
तरी अतिक्रमण काढण्याची जबाबदारी सोसायटीचीच आहे.
> पण जागा सिडकोच्या मालकीची आहे.
प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अतिक्रमणाला हात लावता येत नाही.
> जागा तुमची म्हटल्यावर अतिक्रमण तुम्ही काढायला हवे.
याबाबत मी आमच्या कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेतो.

थेट सवाल- सुधाकर तेलंग प्रशासक, सिडको

तुम्ही रसोई बार व भाई हिराचंद क्रेडिट सोसायटीला दिलेल्या जागेवर अवैध कब्जा केला आहे.
हा आरोप खोटा आहे. विकास देशमुख हे माझे लहान भाऊ आहेत. ते सतत खोट्या तक्रारी करतात. आजवर त्यांनी 130 पेक्षा जास्त तक्रारी माझ्याविरोधात केल्या आहेत. आता पोलिसही कंटाळले आहेत.
पण ही जागा सिडकोची असल्याचे या कार्यालयानेच एका पत्रात म्हटले आहे. त्यामुळे तुमचे बांधकामच अवैध ठरते.
शिवज्योती सोसायटीची स्थापनाच माझे वडील उत्तमराव देशमुख यांनी केली. त्यांनी स्मरणपत्र केले तेव्हा विकासच्या इच्छेनेच या सर्व जागा मला मिळाल्या आहेत.
तुमचे बांधकाम वैध कसे आहे?े
माझे तीन प्लॉट आहेत. त्यातील दोन प्लॉटवर मी बांधकाम केले. पुढे शिवज्योती कॉलनी व सिडकोचा वाद न्यायालयात गेला. त्यामुळे 32 घरांचे बांधकाम सिडकोने अवैध ठरवले. यात रसोई हॉटेल व हिराचंद बँक जेथे आहे त्या जागेचाही समावेश आहे. त्यामुळे सिडकोच्या दप्तरी ही जागा अवैध आहे. या जागेची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. तेव्हा संजय भाटिया मुख्य प्रशासक होते.
तुमचे प्लॉट निवासी असताना तुम्ही हॉटेल कसे बांधले?
मी तशी लेखी परवानगी सोसायटीच्या अध्यक्षांकडून घेतली आहे.
> सोसायटीचे अध्यक्ष म्हणतात तुम्ही त्यांच्या खोट्या सह्या केल्या..
मुळीच नाही. सोसायटीचे अध्यक्ष अंबादास मानकापे खोटे बोलत आहेत.

विजय देशमुख यांनी अध्यक्षांची खोटी सही केलेला अर्ज. 2. माहितीच्या अधिकाराअंतर्गत सिडकोने दिलेली कागदपत्रे. त्यात भूखंड व्यावसायिक वापराकरता देण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तुमच्या सोसाटीचे काय प्रकरण आहे?
यात कोणा एकाचा दोष नाही. सिडकोच्या अधिकार्‍यांच्या बदल्या होतात. आमच्याकडूनही पैसे भरायला उशीर झाला. त्यामुळे सगळा प्रकार लांबला.
तुमच्या सोसायटीमध्ये बार व बँक कशी आली?
त्याची परवानगी मी दिलेली नाही. तो अधिकार सिडकोचा आहे.
सिडको म्हणते सोसायटीलाच जबाबदार धरणार.
मी स्वत: सोसायटीतील 56 घरे बांधण्यासाठी सिडकोकडून परवानगी घेतली. मग ही परवानगी कशी देईन?
मग दोषी कोण आहे?
विजय देशमुख दोषी आहेत. त्यांनी माझ्या खोट्या सह्या करून या जागेचा व्यावसायिक वापर करण्याची परवानगी घेतली. मी तशी तक्रारही पोलिस ठाण्यात केली आहे.
अतिक्रमण काढायचे कुणी?
सिडकोनेच. कारण सध्या जागेचा मालकीहक्क सिडकोकडेच आहे. सिडकोनेच 7 हजार चौ.मी. जागा रद्द ठरवली. बँक व बार त्याच क्षेत्रफळात येते. तसेच चिश्तिया कॉलनीतील अतिक्रमणांकडे मनपा अन् सिडकोचे दुर्लक्ष होत आहे. तेथे आमच्याच सोसायटीची जागा चोरून तीनमजली इमारत होत आहे.