आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलमंडी येथे रस्त्यावर विक्रेते बसल्याने वाहतुकीची कोंडी, स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सुपारी हनुमान मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर अनेक विक्रेते पूजेचे आणि इतर वस्तू विक्रीसाठी हातगाडे लावतात, तर काही रस्त्यावरच बसतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. एकाच ठिकाणी वर्दळ होत असल्याने दुचाकीधारक हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करतात. रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या विक्रेत्यांना हटवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

गुलमंडी आणि सुपारी हनुमान मंदिराकडून पानदरिब्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर काही वर्षांपासून हातगाड्या चालकांसह रस्त्यावर पान, फूल विक्रेते मध्यभागी बसतात. दोन्ही बाजूंनी कायमस्वरूपी स्थानिक व्यापारी दुकाने लावून बसलेले आहेत. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अरुंद रस्ता मिळत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. पायी चालणाऱ्यांनासुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. हातगाड्या मध्यभागी लावल्यामुळे बाजूने तीनचाकी ऑटोरिक्षासुद्धा जात नाही, अशा परिस्थितीमुळे कायमस्वरूपी असलेल्या दुकानात ग्राहक येत नसल्यामुळे आर्थिक फटका बसत असल्याचे येथील दुकानचालकांनी सांगितले.
^व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरपरिणाम होत आहे. दुचाकी, तीनचाकी वाहनसुद्धा रस्त्याने जाऊ शकत नाही. -माधव जंगम, व्यापारी

^रस्त्याच्या मध्यभागीबसलेल्या विक्रेत्यांना हटवले पाहिजेत. त्यामुळे रस्ता मोकळा होऊन वाहनांची कोंडी कमी होण्यास मदत होईल. याकडे मनपा प्रशासन, पोलिस प्रशासनाने लक्ष घालावे. -विजय पटेल, रहिवासी
^ रस्त्याच्यामध्यभागी विक्रेते हातगाड्या लावून उभे आहेत. यामुळे वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. -जितेंद्र चंडालिया, व्यापारी
बातम्या आणखी आहेत...