आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजनगरात अतिक्रमणे बोकाळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - बजाजनगर वसाहतीतील विविध चौकांना अतिक्रमणांनी वेढा घातला आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून किरकोळ अपघातही होत आहेत. त्यामुळे हा अतिक्रमणांचा अडथळा दूर करण्याची मागणी होत आहे.

बजाजनगरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी एमआयडीसी प्रशासनाने कामगार वसाहतीत मुख्य रस्ते व चौक निर्माण केले. कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण टाळले जाऊन पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी अनेक ठिकाणी ग्रीन झोन, मोकळ्या जागा सोडल्या आहेत; परंतु लहान-मोठे व्यावसायिक या ग्रीन झोन आणि मोकळ्या जागांसह विविध चौकांत अतिक्रमण करत आहेत. या अतिक्रमणांचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. अतिक्रमणकर्त्यांनी एमआयडीसीची जाहिरात फलकेही सोडली नाहीत. त्यामुळे ही अतिक्रमणे दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहेत. ही अतिक्रमणे तातडीने क ाढून चौक मोकळे करण्याची मागणी वाहनधारक व कामगारांतून होत आहे.

दरम्यान, बजाजनगरसह एमआयडीसीतील सर्व अतिक्रमणे क ाढण्यात येणार असून त्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची मदत घेतली जाणार आहे. त्यासंबंधीची बैठकही लवकरच घेऊन नियोजन केले जाणार असल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे यांनी सांगितले.