आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानावर अतिक्रमण, शहर एकवटले, दोघांवर गुन्हा, पोलिसांसह अधिकारी मैदानात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- कावसनकर क्रीडा संकुलाची मोजणी करून संकुल अतिक्रमणमुक्त करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शहरातील क्रीडाप्रेमी एकत्र येत क्रीडांगण अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी केली. मात्र अतिक्रमणधारकांनी याला जोरदार विरोध करत चक्क महिलांना पुढे केले. परंतु शहरातील नागरिक अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीवर ठाम राहिल्याने अतिक्रमण करणारे महताबसिंग भारतवाले सोमनाथ भारतवाले यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्यावरून अंतर्गत पैठण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

पैठणच्या क्रीडांगणाच्या परिसरात भारतवाले यांनी अतिक्रमण केल्याची बाब समोर आल्याने त्या जागेची मोजणी करण्यासाठी गुरुवारी भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांसह क्रीडा अधिकारी आले. त्या अनुषंगाने आज जागेची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आले असता संबंधित अतिक्रमणधारकाने महिलांना पुढे करून मोजणीच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

क्रीडा संकुल अतिक्रमणमुक्त व्हावे म्हणून आज क्रीडा संकुलावर मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी एकत्र आले होते. त्यात प्रामुख्याने नगराध्यक्ष सूरज लोळगे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, नगरसेवक भूषण कावसनकर, सोमनाथ परळकर, कल्याण भुकेले, इरफान बागवान, बाळासाहेब माने, शहादेव लोहारे, नारायण खरात, अरुण काळे, कमलाकर वानोळे, विजय चाटुपळे, अतीश गायकवाड, अाशिष मापारी, वैभव पोहेकर, अजय परळकर, विजय सुते, कपिल कावसनकर, अमोल भागवत, किशोर सदावर्ते, स्वप्निल साळवे आदींचा समावेश होता. 

जनतेसह अधिकारी हजर 
यावेळी उपजिल्हाधिकारी विजयकुमार फड, प्रभारी तहसीलदार रमेश मुनलोड नायब तहसीलदार आनंद बोबडे यांनी क्रीडा संकुलास भेट देऊन तालुका क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे यांना क्रीडांगणाच्या मोकळ्या जागेत चर खोदण्याचे आदेश दिले असता या वेळी अतिक्रमणधारकाने माझा रस्ता आहे म्हणत जेसीबीला आडवे होत अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी महिलांना पुढे केले. याप्रकरणी क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोजणी अडथळा.. 
पैठणच्याकावसनकर क्रीडा संकुल अतिक्रमणप्रकरणी क्रीडाप्रेमी गणेश पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी निवेदने दिली. प्रकरणी तालुका क्रीडा आधिकाऱ्यांनी भूमी अभिलेखात जागेच्या मोजणीची मागणी केली. त्यानुसार आज भूमी अभिलेख कार्यालयाचे पथक मोजणीस आले असता या ठिकाणी अतिक्रमणधारकाने मोजणीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 
बातम्या आणखी आहेत...