आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे हे अतिक्रण करत असतानाच संरक्षक भिंती फोडून दगडांची चोरी करण्यात आली. परिसरातील मुरुमावरही डल्ला मारला जात आहे. विद्यापीठाचा २५० एकरांपेक्षा जास्त परिसर आहे. नाट्यशास्त्र विभागाच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, विद्यापीठ प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
भिंत फोडून दगडांची चोरी
विद्यापीठ परिसरात अतिक्रमण होऊ नये, यासाठी संपूर्ण परिसराला दगडी संरक्षक भिंतीचे कवच आहे. असे असतानाही नाट्यशास्त्र विभागाच्या मागच्या बाजूला अतिक्रमण झाले आहे. विद्यापीठाभोवती असलेली संरक्षक भिंत जागोजागी फोडली गेली आहे. त्यातील दगड व इतर साहित्य चोरून नेले जात आहे. शिवाय येथील जागेवर कायमचा कब्जा केला जात आहे.
जनावरांसाठी गोठे
विद्यापीठ परिसरात विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. शिवाय विद्यापीठाने शेकडो एकर जमिनीवर फळांचे मळे फुलवले आहेत. झाडांच्या संरक्षणासाठी सर्व बाजूंनी तारेचे कुंपण व दगडाच्या संरक्षक भिंती बांधल्या आहेत. मात्र, नागरिकांनी यापलीकडे जाऊन जनावरांसाठी येथे थेट गोठेच बांधले आहेत.
विद्यापीठ प्रशासन झोपेत
वाढते अतिक्रमण आणि जनावरांचा वावर रोखण्यासाठी विद्यापीठाने कोणतीच पावले उचलली नाहीत. परिणामी नागरिकांची हिंमत वाढल्याने विद्यापीठाची जागा फुकटात जाण्याची भीती आहे. लवकरच याला आळा घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती काही प्राध्यापकांनी डीबी स्टारशी बोलताना व्यक्त केली.

अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले
विद्यापीठाच्या जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. पैकी तब्बल ३५ प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. नागनाथ कोत्तापल्ले हे कुलगुरू असताना संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी देण्यात आला होता. याबाबतही मला काही मािहती नाही. त्यामुळे त्याबाबतही मी तुम्हाला काही सांगू शकत नाही.
-धनराज माने, कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ