आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलेनगरातील दहा मालमत्ता भुईसपाट; दोन महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- फुलेनगरातील अतिक्रमण हटवताना दोन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. दिवसभरामध्ये सात घरे आणि तीन दुकाने भुईसपाट करण्यात आली.

80 फुटांचा रस्ता मोकळा करण्यात आला आहे. पीरबाजारलगत असलेल्या मनपाच्या आणि खासगी जागेवर अकरा जणांनी अतिक्रमण केले होते. बुधवारी दहा मालमत्ता पाडण्यात आल्या. कारवाईवेळी उपायुक्त शिवाजी झनझन, प्रशासकीय अधिकारी प्रियंका केसरकर, विठ्ठल डाके उपस्थित होते. अतिक्रमण काढताना मोठय़ा प्रमाणात गर्दी जमली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. कलाबाई दाणेकर आणि शाईन शेख अंजुम या महिलांनी अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर व माजी नगरसेवक प्रकाश जावळे यांच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल झाला.