आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साता-यात नागरिकांनी अतिक्रमणाचा डाव उधळला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सातारा परिसरातील न्यू विद्यानगर वसाहतीतून रेणुकामाता मंदिर कमानीकडे जाणा-या रस्त्यावर अतिक्रमण करणा-यास येथील नागरिकांनी विरोध केला. उपविभागीय अधिकारी संभाजी आडकुणे यांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करायला लावला. त्यानंतर अतिक्रमण केल्यास कार्यवाहीचा इशारा देण्यात आला. येथील गट क्रमांक 91 ते 107 मधील सातारा ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणा-या रस्त्यावर मुरूम, माती टाकून रस्त्याचे अस्तित्व नष्ट केले जात होते, पण वेळीच येथील नागरिकांनी याची दखल घेत उपविभागीय अधिका-यांना दूरध्वनीवरून घडलेली बाब सांगितली. त्यांनी त्वरित मंडळ अधिकारी एन. व्ही. देशटवार व तलाठी एस. बी. रमंडवाल यांना घटनास्थळी पाठवले. अतिक्रमण करणा-यांपैकी नजीर पटेल याला अधिका-यांनी अतिक्रमण करू नये, असा सल्ला दिला. उपस्थित अधिका-यांसमोर नागरिकांनी नजीरवर प्रचंड रोष व्यक्त केला. विद्यानगर ही वसाहत बीड बायपासला जोडून असल्याने गेल्या 25 वर्षांपासून येथील रहिवाशांनी रस्त्यांची मागणी केली, परंतु अद्याप तेथे रस्ता न झाल्याने येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कुणालकुमार यांना निवेदन दिले.
* या प्रकरणाची रीतसर चौकशी करून मूळ नकाशात रस्त्याचा उल्लेख असेल तर येथे रस्ताच होणार आहे. मंडळ अधिकारी व तलाठ्यास याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अतिक्रमण करणा-यांवर कार्यवाही करण्यात येईल. - संभाजी आडकुणे, उपविभागीय अधिकारी.
* अतिक्रमण करण्याचा आमचा प्रयत्न नव्हता. उलट आम्ही रस्त्यात पाणी साचत असल्याने नागरिकांच्या सोईसाठी रस्ता व्यवस्थित करण्याचे काम करीत होतो. पण रहिवाशांच्या गैरसमजामुळे हा प्रकार घडला. - नजीर पटेल, रहिवासी.