आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ५० रस्त्यांवर मनपा करणार मार्किंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विश्रांती नगरात ८० फुटी रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचा विषय पांगत चालला असून त्यापासून धडा घेत मनपाने आता विकास आराखड्यातील रस्ते वाचवण्यासाठी शहरातील सुमारे ५० रस्त्यांचे मार्किंग करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जागोजाग रस्त्याची रुंदी अतिक्रमण करण्याचे आवाहन असणारे फलकही लावण्यात येणार आहेत.
जयभवानीनगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन या रस्त्यावरील पाडापाडीच्या मोहिमेनंतर शिवाजीनगर ते रामनगर या रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न समोर आला आहे. २० वर्षांपूर्वीच्या विकास आराखड्यात हा ८० फुटी रस्ता नमूद करण्यात आला आहे; पण त्याचे कामच झाले नाही नंतर या जागेवर चक्क घरे उभी राहिली. आता या रस्त्यासाठी हालचाली सुरू झाल्यावर मार्किंग करण्यात आले २५० घरे पाडावी लागणार असल्याचे समोर आले. ही सारी गोरगरिबांची घरे असल्याने हा प्रश्न चिघळत चालला आहे. त्यात आता राजकीय पक्षही उतरल्याने नवीन तिढा निर्माण होत आहे. आता रस्त्यासाठी या नागरिकांची घरे हटवताना मनपाला भरपाईचा भुर्दंड द्यावा लागणार आहे.

हे आहेत काही प्रमुख रस्ते
{कटकटगेट ते पोलिस मेस
{चंपा चौक ते रोशन गेट
{जिन्सी ते बायजीपुरा

लगेच कामे होतील
यामार्किंगनंतर जे रस्ते योग्य आहेत हे ध्यानात येईल, त्या रस्त्यांची कामे लगेच सुरू करता येतील, असेही महापौर म्हणाले. शहराची दळणवळण व्यवस्था रुंद चांगल्या रस्त्यांवरच अवलंबून असल्याने हे रस्ते विकास आराखड्यानुसारच केले जातील. त्यात अतिक्रमणांचा ताण वाढू नये हे पाहिले जाईल, असेही ते म्हणाले.

महापौरांकडून समर्थन
महापौर त्र्यंबक तुपे यांनी या मार्किंगचे समर्थन करताना सांगितले की, या रस्त्यांवर मार्किंग केल्यानंतर तेथे रस्ता किती लांबी, रुंदीचा आहे कुठून कुठपर्यंत आहे याची माहिती सांगणारा यावर अतिक्रमणे करू नका, अशी माहिती देणारे फलक जागोजागी लावावे; जेणेकरून नागरिकांना रस्त्यावर बांधकाम केले तर ते पाडले जाईल याची जाणीव होईल कुणी तसे करायला धजावणार नाही.
मनपाने धडा घेतला

यापासूनधडा घेत मनपाने आता विकास आराखड्यात नमूद करण्यात आलेल्या ५० हून अधिक रस्त्यांचे मार्किंग करण्याचा निर्णय घेतला आहे. नगररचना सहायक संचालक डाॅ. डी. पी. कुलकर्णी यांनी सांगितले की, शहरात असे ५० हून अधिक रस्ते आहेत. त्या सर्वांचे मार्किंग करून तेथे अतिक्रमण होऊ नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे.