आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवाळीपूर्वी परीक्षा संपणार, २२ दिवसांच्या सुट्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विविध अभ्यासक्रमांचे परीक्षा शुल्क आणि परीक्षांचे वेळापत्रक दर्शवणारी पुस्तिका तयार केली आहे. सर्व महाविद्यालयांना ही पुस्तिका वितरित केली जाणार असून परीक्षांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हा पहिलाच प्रयोग आहे. ऑक्टोबरपासून पदवीच्या तर १६ ऑक्टोबरपासून पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा सुरू होतील. बहुतांश परीक्षा दिवाळीपूर्वीच संपवण्याचे नियोजन असून नोव्हेंबरपासून विद्यापीठाच्या दिवाळी सुट्या आहेत.
डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्याकडे परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यभार आल्यानंतर त्यांनी सर्व विषयांचा निकाल वेळेत देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी सत्र परीक्षांचे वेळापत्रक अकॅडमिक कॅलेंडरमध्ये जाहीर करण्यात आलेलेच आहे. मात्र त्यांनी महाविद्यालयीन पातळीवरील परीक्षांचा गोंधळ दूर करण्यासाठी रंगीत मुखपृष्ठ असलेली छोटी माहिती पुस्तिकाच तयार केली आहे. हजार प्रतीत प्रसिद्ध करण्यात आलेली पुस्तिका लवकरच महाविद्यालयांना वितरित केली जाणार आहे. त्यामध्ये ऑक्टोबरपासून पदवीच्या तर १६ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याशिवाय परीक्षांचा कालावधी कमी करून पुढील निकाल वेळेत लावण्याचे नियोजन आतापासूनच करण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी पदवीच्या परीक्षा सुमारे २४ दिवस सुरू होत्या, यंदा १४ दिवसांत परीक्षा संपणार आहेत. दीड महिना लागणाऱ्या बीएस्सीच्या परीक्षांचा कालावधी अवघ्या २६ दिवसांवर आणला आहे. विधी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑक्टोबरपासून सुरू होऊन फक्त १२ दिवसांत संपणार आहेत. शारीरिक शिक्षण आणि शिक्षणशास्त्र विषयांच्या परीक्षा १७, २३ आणि २६ नोव्हेंबरपासून सुरू होतील. सर्व अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा मागील वर्षी दोन आठवडे सुरू होत्या. यंदा १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा फक्त एकच आठवड्यात संपणार आहेत. पदवी, पदव्युत्तर पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा नोव्हेंबर रोजी संपतील. विद्यापीठाला दिवाळीच्या २२ दिवसांच्या सुट्या असून नोव्हेंबरपासून सुट्या सुरू होणार आहेत. तत्पूर्वी बी. ए., बी. कॉम., बी.एस्सी सर्व प्रकारच्या पीजीचे महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षा संपणार आहेत. माहिती पुस्तिकेमध्ये परीक्षा शुल्कांची निर्धारित रक्कम अभ्यासक्रमनिहाय दिलेली आहे. त्याशिवाय अभ्यासक्रमनिहाय परीक्षा शुल्क भरण्याच्या तारखा, परीक्षा प्रक्रियांची महत्त्वाची माहिती, सूचनांचा स्पष्टपणे उल्लेख डॉ. लुलेकर यांनी केला आहे. या प्रयोगामुळे परीक्षेतील गोंधळ कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

अभियांत्रिकी विद्या शाखेतील बीटेक, एमटेक, बी. फार्मसी, एम. फार्मसी, डिप्लोमा इन फार्मसी आणि मास्टर ऑफ इंजिनिअर, अार्किटेक्चरच्या परीक्षांना मात्र दिवाळी झाल्यानंतर एक महिन्याने प्रारंभ होणार आहे. प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे डिसेंबरपासून अभियांत्रिकीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे.