आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एंड्रेस प्लस हौजर कंपनी सोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: एंड्रेस प्लस हौजरसोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. स्वाक्षऱ्या केल्यानंतर करार दाखवताना कुलगुरू आणि कंपनीचे अध्यक्ष, वरिष्ठ अधिकारी.
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ऑटोमोबाइल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनी ‘एंड्रेस प्लस हौजर’ यांच्या दरम्यान पुन्हा एकदा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार विद्यापीठातील २० विद्यार्थ्यांना दरवर्षी २५ हजार रुपयांच्या फेलोशिपसह प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी बैठक घेण्यात आली. एंड्रेस प्लस हौजर इंडिया ऑटोमेशन कंपनीचे अध्यक्ष एन. श्रीराम, एंड्रेस प्लस हौजर फलोटेकचे के. कुमार यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. विद्यापीठातील पदार्थविज्ञान, संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान, रसायनतंत्रशास्त्र विभाग तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांना दरवर्षी २५ हजार रुपयांची फेलोशिप दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कंपनीच्या प्रयोगशाळा आणि कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उभय संस्थांमध्ये संयुक्त प्रकल्प साकारण्यात येणार आहेत. सॉफ्टस्किल्स, मूल्यवर्धित कोर्सेस, क्रॅश कोर्सेसचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यापीठ चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अंॅड अॅग्रीकल्चर या दोन संस्थांतर्फे २९ ३० ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या ‘इंडस्ट्री-युनिव्हर्सिटी इंटरअॅक्शन समीट’ मध्येही एंड्रेस प्लस हौजर सक्रियपणे सहभागी होणार असल्याचे एन. श्रीराम यांनी जाहीर केले. बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. महेंद्र सिरसाठ, संगणक माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आर. आर. देशमुख, डॉ. चारुदत्त मुश्रीफ, श्रीमती वैदेही, उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा, निवृत्ती गजभरे आदींची उपस्थिती होती.