आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पुणे येथील एका खासगी कंपनीत अभियंता असलेल्या मुकेश अहिलाजी मोकासरे (38) यांनी बुधवारी (16 जानेवारी) रेल्वेस्टेशनजवळील द्वारका लॉजच्या खोलीत दुपारी साडेबारा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. ते मूळ कन्नड तालुक्यातील पिशोर येथील होते.

मुकेश 13 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता लॉजवर आले होते. बुधवारी वेटरने खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती क्रांती चौक पोलिसांना देण्यात आली. त्यांनी गळफास घेण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यात ‘जीवनाचा कंटाळा आल्याने आत्महत्या करत आहे,’ असे लिहिलेले आहे. आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असेही नमूद करण्यात आले आहे. मुकेश नातेवाइकाच्या साखरपुड्यासाठी शहरात आले होते. त्यांच्या पश्चात चार भाऊ, सहा बहिणी आणि आई असा परिवार आहे. त्यांचे लग्न गेल्या वर्षी झाले होते. त्यांची पत्नी डॉक्टर असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. पंचनामा झाल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह घाटीत पाठवण्यात आला.