आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineer Son Murdered His Officer Father, Divya Marathi

इंजिनिअर मुलाने केला अधिकारी पित्याचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - तालुका पशुधन अधिकारी डॉ. धनंजय फुलारे यांचा खून पोटच्या मुलानेच केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच मुलाने रविवारी वडिलांचा खून झाल्याची फ‍िर्याद दिली होती.

कन्नड शहरातील गजानन कॉलनी येथील रहिवासी डॉ. फुलारे यांचा लोखंडी पाइपने मारहाण करून खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत मुलगा राजेंद्र फुलारे याने फ‍िर्याद दिली होती. पोलिसांनी राजेंद्रची सखोल चौकशी केली असता त्याने वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. कडुबाई यांनी शनिवार, ४ रोजी कन्नड पोलिसांत पती डॉक्टर फुलारे यांच्याविरोधात मारहाण तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन घराबाहेर काढल्याबाबत फ‍िर्याद दिली होती. त्यानंतर कडुबाईंनी मुलगा राजेंद्र यास पुण्याहून बोलावून घेतले. शनिवारी रात्री राजेंद्र व त्याची आई औरंगाबाद येथे त्याच्या मावशीकडे मुक्कामी थांबले. रविवार, ५ रोजी घरातील सामान आणण्यासाठी राजेंद्र कन्नड येथील घरी आला असता डॉ. फुलारे यांनी राजेंद्रला पाइपने मारण्यास सुरुवात केली. राजेंद्रने तोच पाइप हिसकावून घेत डॉ. फुलारे यांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
दारू पिऊन घरातील मंडळींना त्रास देत असल्यामुळे वडिलांचा खून केल्याची कबुली राजेंद्र याने दिली आहे.