आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदापासून इंजिनिअरिंगचे तीनच राऊण्ड, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रवेश प्रक्रियेत महत्वाचे बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येत्या शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत चार राऊण्ड ऐवजी तीनच राऊण्ड घेण्यात येणार आहे. शेवटचा काऊंसिलिंग राऊण्ड कमी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी इंजिनिअरिंगच्या कॅप राऊण्डमध्ये  फ्रिज, स्लाइड आणि फ्लोट हे पर्याय उपलब्ध असणार आहेत. या प्रवेशासंबंधीची माहिती तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
 
सीईटी अर्थात राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. बारावीनंतर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे जेईई आणि सीईटीच्या माध्यमातून इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. आतापर्यंत इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेत चार राऊण्ड घेतले जात असे. परंतु यंदाच्या प्रवेश प्रक्रियेपासून तीनच राऊण्ड घेण्यात येणार आहे. एक राऊण्ड यावर्षीपासून कमी करण्यात आला आहे.  यामुळे आता तीन फेरीतच प्रवेश प्रक्रिया होईल. अशी माहिती उच्च  व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.महेश शिवणकर यांनी दिली.
 
अशी असेल प्रक्रिया...
प्रथम फ्रिज -  विद्यार्थ्यांला प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात त्याला प्रवेश घ्यायचा असून,त्याला अधिक चांगल्या महाविद्यालयाची अपेक्षा नाही. हा पर्याय निवडल्यानंतर पुढच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी पात्र राहणार नाही.
 
व्दितीय स्लाईड - यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात त्याला प्रवेश घ्यायचा आहे. मात्र त्याच महाविद्यालयामध्ये इतर शाखा मिळण्यासाठी विद्यार्थी इच्छुक राहणार आहेत. हा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना राऊण्डच्या दुसऱ्या  आणि तिसऱ्या फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार आहे.
 
तृतीय फ्लोट - यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. तसेच महाविद्यालयात अधिक चांगले महाविद्यालय मिळाल्यास तेथे देखील तो पवेश घेण्यास इच्छुक आहे. विद्यार्थ्यांना राऊण्डच्या दुसऱ्या व तिसऱ्या प्रवेश राऊण्डमध्ये सहभागी होता येईल.
 
पुढील स्लाईडवर वाचा, शिष्यवृत्तीधारकांसाठी महत्वाच्या सूचना...
बातम्या आणखी आहेत...