आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मराठवाड्यातून 13000 अर्ज, सोमवारी तात्पूर्ती गुणवत्ता यादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
औरंगाबाद - तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ५ जूनपासून सुरूवात झाली. इंजिनिअरिंग प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज भरण्याचा रविवारी शेवटचा दिवस होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मराठवाड्यातील १३ हजार ४४ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे.
 
इंजिनिअरिंग पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरून सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्रांची तपासणी, अर्ज निश्चितीचा रविवार हा शेवटचा दिवस होता. या दिवशी मराठवाड्यातून तब्बल १ हजार ४४ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली. यामुळे मराठवाड्यातून एकुण १३ हजार ४४ विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी सोमवार रोजी १९ जूनला संकेतस्थळावर   जाहीर केली जाणार आहे. यानंतर   २० आणि २१ जून असे दोन दिवस विद्यार्थ्यांना  जाहिर झालेल्या यादीसंबंधी आपले आक्षेप अथवा तक्रारी  नोंदवता येतील.
 
यानंतर २२ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. पहिल्या फेरीसाठी २३ ते २६ जून दरम्यान आॅप्शन फॉर्म भरता येणार आहेत. प्रथम फेरीसाठीचे जागा वाटप २८ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. या पहिल्या फेरीतील  प्रवेश विद्यार्थ्यांना २९ जून ते ३ जुलैपर्यंत निश्चित करावे लागणार आहेत.अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे.
 
 
असे आहेत आतापर्यंत आलेले अर्ज
- इंजिनिअरिंग प्रथम वर्षासाठी मराठवाड्यातनू आलेले अर्ज १३०४४
- फार्मसी  अर्थात औषध निर्माण शास्त्र - १०३८८ 
- आर्कीटेक्चर  - २५९

अशी आहे प्रवेश क्षमता
 
इंजिनिअरिंग विभाग 
- राज्यात एकूण ३७७ कॉलेज
- प्रवेश क्षमता १ लाख ५२ हजार १०० 
- मराठवाड्यात एकूण कॉलेज ३४
- प्रवेश क्षमता १२ हजार ४८२
- औरंगाबाद मध्ये एकूण कॉलेज १५
- प्रवेश क्षमता ६ हजार २६२
 
फार्मसी  विभाग 
- राज्यात एकूण कॉलेज १७५
- प्रवेश क्षमता - १२ हजार १००
- मराठवाड्यात कॉलेज २४ 
- प्रवेश क्षमता १ हजार ८३०
- औरंगाबादमध्ये  कॉलेज ७
- प्रवेश क्षमता ६००
बातम्या आणखी आहेत...