आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियांत्रिकी पेपरफुटी प्रकरण- पीर बाजारातील झेरॉक्स दुकानदारासह दोघांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अभियांत्रिकीच्या पेपरफुटी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी पीर बाजार येथील लकी मल्टी सर्व्हिसेसवर छापा मारून मिर्झा बिलाल बेग इकबाल बेग (20, रा. कोहिनूर कॉलनी) आणि सोहेल खान हबीब खान (19, रा. शरीफ कॉलनी) या दोघांना अटक केली. दुकानातील झेरॉक्स मशीनही सील केले.
पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी 10 विद्यार्थ्यांचे जबाब बुधवारी नोंदवले. उस्मानपुरा परिसरातील वसतिगृहांत राहणाºया अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना 50 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत बेग आणि खान यांनी 22 मे रोजी सायंकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत हस्तलिखित स्वरूपातील प्रश्न व उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स दिल्या होत्या. काही विद्यार्थी पीर बाजारातील लकी मल्टी सर्व्हिसेसमध्ये झेरॉक्स काढण्यासाठी आले होते. त्यांना झेरॉक्स काढून देतानाच त्याची एक प्रत बेगने काढून घेऊन नंतर त्याच्या आणखी झेरॉक्स प्रती काढून खानच्या मदतीने विकल्या होत्या.