आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - अभियांत्रिकी शाखेच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी दोन विद्यार्थ्यांना अटक केली. हे विद्यार्थी एव्हरेस्ट महाविद्यालयातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेख शोएब महंमद शजीऊज झमॉ (19, रा. कटकटगेट) आणि प्रदीप उमेश कुलकर्णी (22, रा. गारखेडा) अशी अटक झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्ट्राँगरूममधील अस्थायी कंत्राटी कर्मचारी सचिन साळुंके याने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा गणिताचा पेपर फोडून तो रणजित वायसळला दिला होता. यानंतर शेख शोएब महंमद आणि प्रदीप कुलकर्णी यांनी रणजितशी संपर्क साधून पेपर मागितला असता त्याने स्वत:कडील पेपर न देता शोएब आणि प्रदीपची सचिन साळुंकेशी भेट घालून दिली. या पेपरसाठी शेख शोएब महंमदने 6 हजार रुपये तर प्रदीप कुलकर्णी याने मला 2 हजार रुपये दिले, अशी कबुली पोलिस कोठडीत असलेल्या सचिन साळुंके याने सोमवारी पोलिसांना दिली. त्याच्या जबाबावरूनच सोमवारी दुपारी पोलिसांनी शोएब आणि प्रदीप या दोघांना अटक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
विद्यापीठ परिसरातील एका झेरॉक्स दुकानदारानेही हा पेपर जवळपास 12 विद्यार्थ्यांना विकल्याचे उघडकीस आले आहे.
परीक्षा विभागात रोजंदार नकोत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यरत रोजंदारी कर्मचार्यांना त्वरित हटवण्यात यावे, अशी शिफारस अभियांत्रिकी पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या डॉ. रत्नदीप देशमुख समितीने केली आहे. समितीने कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांना सोमवारी 20 पानांचा अहवाल सादर केला. परीक्षा मंडळाच्या 7 जूनला बोलावलेल्या बैठकीत हा अहवाल ठेवण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.