आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल रखडल्याने विद्यार्थी अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इंजिनिअरिंगच्याशेवटच्या सत्राचे निकाल परीक्षा होऊन महिना झाला तरी लागले नाहीत. त्यामुळे पुढील शैक्षिणक प्रवेश प्रक्रियेत या विद्यार्थ्यांना सहभागी होता येत नसल्याने साडेसहा हजार विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात अडकले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत जून महनि्यात इंजनििअरिंगच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षा होऊन ४५ दविस उलटले आहेत. इतर विद्यापीठांतील प्रवेश प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. मात्र, या विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. नियमानुसार आतापर्यंत निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधी हुकत आहेत. अनेक विद्यापीठांतील प्रवेशाची अंतिम तारीख १९ आॅगस्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांची प्रवेशाची संधीही हुकण्याची शक्यता आहे.