आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering Students Teach Free To Poor Student, At Aurangabad, Divya Marathi

गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत वर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिक्षण घेणारे अनेक तरुण पाहायला मिळतात. अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून न थांबता दुसर्‍यांच्या शिक्षणात मदत करणारे मात्र फारच कमी आहेत. त्यातच शहरातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुणांनी पुढाकार घेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. गरिबांना शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून संवेदना ग्रुपच्या वतीने करण्यात आलेला हा प्रयत्न तेवढाच उल्लेखनीय आहे.

विद्यार्थ्यांना शिकवणी लावायची म्हणजे मोठय़ा प्रमाणात पैसा मोजावा लागतो. मात्र, ज्या मुलांचे पालक गरीब आहेत, अशा मुलांसाठी शिकवणी म्हणजे स्वप्नच असते. अशा मुलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अँक्टिव्ह इंजिनिअरिंग क्लासेसच्या वतीने होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना पाच मेपासून मोफत शिकवणी देणार आहे. विद्यार्थ्यांनी एकत्र येत घेतलेला समाजसेवेचा हा वसा म्हणजे सर्वांसाठी आदर्श असाच आहे.
गेल्या आठ वर्षांपासून अँक्टिव्ह इंजिनिअरिंग क्लासेसमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन दिले जाते. अभियांत्रिकी पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांकडून हे मार्गदर्शन करण्यात येते. हे सर्व विद्यार्थी गरिबी परिस्थितीतून पुढे आल्याने त्यांना सामाजिक जाणीव आहे. याच अँक्टिव्ह इंजिनिअरिंगच्या टीमने गरीब विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेत दहावीची शिकवणी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. पाच मेपासून विद्यार्थ्यांना या मोफत शिकवणीचा लाभ घेता येणार आहे. यात गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्लिश या तिन्ही माध्यमातून शिकवण्यात येणार आहेत. तसेच व्यक्तिमत्त्व विकास, परीक्षेची भीती कशी दूर करायची, अभ्यास कसा करावा आदींबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिकवणीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन क्लासेसच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रुपच्या या सदस्यांकडून होणार मार्गदर्शन : मोबीन शेख दिलीप सूर्यवंशी, कृष्णा बोडखे, संकेत पुराणिक, राहुल वेताळ, संदीप वाघ, प्रशांत शिंदे, सुरजी जैन, शुभम नागे, प्रियंका पवार, नेहा चव्हाण, पूजा गोरे, जया नरवडे, प्रियंका काळे, प्रिया जगताप, निखिल मगरे, राहुल सोनवणे अशी मोठी टीम या समाजकार्यासाठी तयार झाली आहे.