आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंता आहेत १०वी उत्तीर्ण आयटीआयधारक ठेकेदार, विद्यार्थीच करतात अंदाजपत्रक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिकेतील१८ कनिष्ठ अभियंत्यांचे शिक्षण केवळ १० वी आणि आयटीआय प्रशिक्षण एवढेच असल्यामुळे त्यातील अनेकांना कामाचे माप घेणे आणि अंदाजपत्रक बनविण्याचेही काम व्यवस्थित येत नाही. त्याचा लाभ घेऊन अनेक ठेकेदार स्वत:च कोट्यवधी रुपयांच्या कामांचे अंदाजपत्रक बनवतात आणि त्यावर कनिष्ठ अभियंता पदावर असलेले कर्मचारी सही करतात ही वस्तुस्थिती आहे. दरवर्षी १५० कोटी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेच्या कामांना दर्जा का नसतो, याचे हे उत्तर आहे.

महापािलकेच्या प्राथमिक जबाबदारीत रस्ते, गटारी, पथदिवे आणि पाणीपुरवठा या कामांचा समावेश प्राधान्याने आहे. ही कामे करवून घेण्याची आणि त्यांचा दर्जा राखण्याची जबाबदारी महापालिकेच्या अभियंत्यांची आहे. महापालिकेच्या अस्थापनेवर असलेल्या ५८ कनिष्ठ अभियंता आणि शाखा अभियंत्यांपैकी १८ जण केवळ १० वी उत्तीर्ण असून त्यानंतर त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सर्वेअरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्या अभ्यासक्रमात केवळ पातळी (लेवल)तपासणे शिकवले जाते.

पूर्ण झालेल्या कामांच्या अचूक नोंदीही करता येत नाहीत
शिक्षणाच्या आधारावर महापािलकेत कनिष्ठ आवेक्षक म्हणून नोकरी लागल्यानंतर अनेकांनी दोन दोन बढत्या मिळवण्यात यश मिळवले असून ते कनिष्ठ अभियंता बनले आहेत. मात्र, शिक्षणात वाढ झाल्यामुळे अभियंता म्हणून करायची कामे त्यातील बहुतेकांना करताच येत नाहीत. त्यात सर्वात महत्त्वाचे काम आहे कामाचे अंदाजपत्रक बनवणे. या कामासाठी किमान स्थापत्य अभियंता पदविका(डीसीई) घेतलेली असणे आवश्यक असते. यांनी ते शिक्षणच घेतल्यामुळे ते काम करता येत नाही. कामांचे माप घेता येत नाही आणि दर्जाही तपासता येत नाही, अशी यातील बहुतेकांची अवस्था आहे.

काय होते नुकसान
रस्ता,ड्रेनेज किंवा इमारत बांधकामासाठी नेमका किती खर्च येणार आणि कामाचा आराखडा कसा असेल हे अंदाजपत्रकातच निश्चित केले जाते. पण त्याचे परिपूर्ण ज्ञान नसल्याने बहुतांशवेळा नगरसेवक, ठेकेदार म्हणेल तेवढ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जाते. एवढेच नव्हे तर कामांच्या दर्जा तपासणीच्यावेळीही हे अभियंते नगरसेवकांच्या दबावाला बळी पडतात. आणि कार्यादेशातील नमूद अटी, शर्ती आणि मानकांनुसार काम झाल्याचे फाईलमध्ये नोंदवून स्वत:ची सुटका करून घेतात. नंतर नागरिकांनी दर्जेदार काम नसल्याच्या तक्रारी केल्यावर त्यांचे पितळ उघडे पडते.

ठेकेदार, विद्यार्थी करतात काम
कनिष्ठअभियंता असूनही शिक्षणाअभावी अंदाजपत्रक तयार करता येत नसल्याने ज्या ठेकेदाराला काम हवे असते तोच त्या कामाचे अंदाजपत्रक आपल्या सोयीनुसार बनवून आणतो. ते उघडूनही पाहाताच हे अभियंते त्यावर सही करतात. ठेकेदारांचा रस नसलेले काम असेल तर बऱ्यादचा हे काम अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचे तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी हे काम या अभियंत्यांना करून देतात. त्यासाठी प्रत्येकी ५०० ते हजार रुपये हे विद्यार्थी घेतात. ही रक्कम अर्थातच अन्य ठेकेदारांकडून वसूल केली जाते, अशी माहिती आहे. हे सर्व वरिष्ठांनाही माहिती असते. मात्र, अन्य पर्याय नसल्याने तेही डोळेझाक करतात.

चौघांनी तर दिली होती लेखी कबुली
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी काही कामांची चौकशी केली. तेव्हा त्यात अंदाजपत्रक आणि काम पूर्ण झाल्यानंतरच्या मोजमापात घोळ झाल्याचे निदर्शनास आले. आम्हाला अचूक अंदाजपत्रक, डिझाइन तयार करता येत नाही. मोजमापे करणेही अवघड जाते, अशी कबुली अभियंत्यांनी दिली होती. त्यामुळे त्यांनी चौघांना निलंबितही केले होते. नंतर कामात सुधारणा करू, अशी हमी घेऊन त्यांना रुजू करून घेण्यात आले. ती सूत्रांनी दिली.

रोज किमान एक अंदाजपत्रक
औरंगाबाद महापालिकेत प्रत्येक अभियंत्याला सरासरी रोज किमान एक अंदाजपत्रक बनवावे लागते. त्यात रस्ते, ड्रेनेजलाइन, जलवाहिनी आणि इमारत बांधकामांचा समावेश असतो.
बातम्या आणखी आहेत...