आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकातल्या कविता, गोष्टी माणसाला घडवतात : वैद्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लेखनाचे सर्व श्रेय मी माझ्या गावाला देतो. गावात साहित्याचे वातावरण नव्हते; परंतु खुल्या निसर्गाचे पुस्तक मी मनसोक्त वाचले. पुस्तकातल्या कविता, गोष्टींनी मला लळा लावला. पुस्तकांना मी कायम जपत आलोय. कारण पुस्तकातल्या गोष्टी माणसाला घडवतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी केले.
सेंट जॉन इंग्लिश हायस्कूलमध्ये "लेखक आपल्या भेटीला' कार्यक्रमात ते बोलत होते. रवींद्र डोंगरदिवे, संचालक जेम्स डोंगरदिवे, पल्लवी डोंगरदिवे, रुदा डोंगरदिवे, मुख्याध्यापिका मनवीन कौर यांची उपस्थिती होती. या वेळी वैद्य यांनी बालपणीच्या आठवणी जागवल्या. व्यक्त होण्याच्या प्रक्रियेतूनच लेखन कलेकडे वळल्याची भावना वैद्य यांनी व्यक्त केली. कविता, नाटक, लेखन आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी मनसोक्त उत्तरे दिली. रवींद्र डोंगरदिवे, कौर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. रमेश रावळकर यांनी सूत्रसंचालन केले.