आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Enter Pawar On Offense, Buddhapriya Kabir's Demand, Divya Marathi

पवारांवर गुन्हा दाखल करा, बुद्धप्रिय कबीर यांची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘बोटावरची शाई पुसा आणि दोन वेळा मतदान करा’ असा नवी मुंबई येथील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात घटनाबाह्य सल्ला देणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर औरंगाबादेत फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी अखिल भारतीय संविधान संरक्षण अधिकार मंचातर्फे बुद्धप्रिय कबीर यांनी पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्याकडे शुक्रवारी (28 मार्च) केली आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पार पाडायची असेल तर येथे गुन्हा दाखल करून अशा कुप्रवृत्तीवर आळा घाला. माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवार यांनी आपल्या मागील 50 वर्षांच्या राजकीय वाटचालीत कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या, हे सिद्ध करणारे विधान केले. त्यांनी प्रत्येक वेळी बोगस मतदान करून घेतल्याचा आरोपही बुद्धप्रिय कबीर यांनी तक्रारीत केला आहे.