आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता प्रवेश पास अनिवार्य; गर्दी कमी करण्यासाठी उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/उस्मानाबाद-  कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता प्रवेश पास अनिवार्य करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाल्याने कर्मचारी, भाविकांसह पुजार्‍यांनाही प्रवेशावेळी हा पास सक्‍तीचा असेल. नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
तुळजापुरात  मोठ्या संख्येने भाविक
दर रविवारी तुळजापुरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिर प्रवेशद्वारावर त्यांना पास नसल्याने अडवण्यात येत आहे. धर्मशाळेत हे पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तेथून पास घेतल्यानंतर मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरातील गर्दी कमी करण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे सांगितले जात आहे. मंदिर व्यवस्थापक (तहसीलदार) सुनील पवार यांनी ट्रस्टच्या ठरावांनुसार याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...