आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Environment Conservation,latest News In Divya Marathi

पर्यावरण संवर्धनाबरोबर 12 महिलांना दिला रोजगार, महिन्याला 10 हजार कागदी पिशव्यांची निर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्लास्टिक बॅगच्या वापरामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. प्रदूषणाला आळा बसावा आणि पर्यावरण संवर्धन व्हावे, यासाठी काल्डा कॉर्नर येथे राहणाऱ्या आर्किटेक्ट सुनीता काळे आणि पती माधव काळे या दांपत्याने कागदी, कापडी पिशव्याची निर्मिती करत आहेत. गरीब, होतकरू 12 महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन महिन्याला दहा हजार पिशव्यांची निर्मिती करत आहेत.
काळे दांपत्याने समाजाशी नाळ कायम जोडलेली राहावी म्हणून झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देत हजारो झाडे लावून त्यांची जपणूक केली आहे. अमेरिका, युरोप या देशांत काम केल्यानंतर सुनीता या औरंगाबादेत स्थायिक झाल्या. प्रदूषणाला आळा बसावा म्हणून प्लास्टिक बॅगला पर्याय म्हणून कागदी पिशव्या बनवण्याची संकल्पना त्यांना सुचली. सुरुवातीला कॉलनीतील महिलांमध्ये याबाबत जनजागृती केली. स्वत:च्या हाताने कागदी पिशव्या तयार करून त्यांची िवक्री केली. समाजातील गरीब महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सुरुवातीला कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांच्याकडून पेपर बॅग, कॉटन बॅग, फॅब्रिक बॅग आणि टाकाऊ साड्या आणि कपड्यांपासून बॅग तयार करण्याचे कार्य जोमाने सुरू केले.
मुकुंदवाडी, मिलिंदनगर, सातारा परिसर, बालाजीनगर या भागांतील दहा ते बारा कुटुंबांतील महिलांना रोजगार मिळाला असून महिन्याला दहा हजार पिशव्यांची निर्मिती करण्यात येते. पुण्याच्या एका संस्थेला या बॅग्ज पाठवल्या जातात. शिक्षण न घेणाऱ्या महिलांसाठी चांगला उपक्रम हाती घेतला आहे.

काळानुसार नक्षीकाम केलेल्या पिशव्यांची निर्मिती
जुन्या पद्धतीच्या पेपर बॅगला बाजारात पाहिजे तशी मागणी मिळत नाही, म्हणून सुनीता यांनी आकर्षक पिशव्यांचे डिझाइन तयार केले आहे. पांढऱ्या, रंगीबेरंगी आकाराच्या बॅगवर कागदापासून तयार केलेली फुले लावून नक्षीकाम केले जात आहे.