आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वटवृक्षावर बागडणा-या पक्षांचा किलबिलाट झालाय दुर्लभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डेरेदार अशा या वटवृक्षाच्या आजूबाजूला एक दुनिया वावरत असते. परंतु विशालमहाकाय वटवृक्ष नामशेष होत असल्याने त्यावर बागडणारे पक्षीही नामशेष होत आहेत.
घुबड, कावळे, घार, गिधाड, कबुतर, चिमण्या, पारवे, पोपट आदी पक्षी राहतात. तर खारी, वटवाघळे, पोपट, बुलबुल आदी वडफळांवर ताव मारण्यासाठी झाडावर खेट्या मारतात. वडाची बारीक बारीक फळे हे या पक्ष्यांचे अन्न आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व या झाडावर अवलंबून आहे. त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडणार्‍या बियांमुळे परागीभवनाचे काम होते. झाडांच्या बिया अन्य ठिकाणी रुजून पर्यावरण संवर्धनास मदत होते.
परिसरात वडाच्या झाडाचे अस्तित्व असणे हे त्या परिसरात पर्यावरण समतोल असल्याचे द्योतक आहे. वडाच्या पारंब्या जमिनीत रुजून नवीन झाड तयार होते. त्यामुळे दाट झाडी तयार होऊन त्याखाली लहान वनस्पती वाढू शकतात. शहरीकरणामुळे मोठी वृक्षतोड झाली. निसर्गाचा समतोल बिघडून गेला आहे. या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलली जावीत.

वटवृक्षावर बागडणार्‍या पक्ष्यांचा किलबिलाट आता झालाय दुर्लभ

चिमणी (हाऊस स्पॅरो),
वर्णन : चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा आणि पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. तर मादी मातकट तपकिरी रंगाची, वरून काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा, चोच फिकट तपकिरी रंगाची अशी ओळख असते.

खाद्य : कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न, आर्शयस्थान : वडाचे झाड.

संख्या : नामशेष होण्याच्या मार्गावरा.

कावळा - खाद्य : शिजवलेले अन्न, धान्य, उंदीर, उधळी, लहान पक्षी, त्यांची अंडी, मृत जनावरे

वर्णन : कावळा माणसाच्या वसाहतीजवळ पण घरात न येणारा सर्वपरिचित पक्षी आहे. हा पक्षी चलाख, सावध, चपळ, खाण्यासाठी विशिष्ट आवड नसलेला आहे. कावळा हा सुमारे 17 इंच आकाराचा मानेजवळचा भाग राखाडी रंगाचा तर उर्वरित काळ्या रंगाचा एक पक्षी आहे. नर-मादी दिसायला सारखेच असतात. तर संपूर्ण काळ्या रंगाच्या कावळ्याला डोमकावळा असे म्हणतात.

पोपट - शास्त्रीय नाव : psittacula krameri खाद्य : मिरची, पेरू, डाळ

संख्या: संख्या कमी झाली आहे.

घार - वर्णन : घार ही एक शिकारी पक्ष्यांची जात आहे. तिचा रंग तपकिरी असून तिच्या अंगावर भरपूर पिसे असतात. तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. घारीची शेपटी दुभंगलेली असते. त्यामुळे उडत असताना घार सहज ओळखता येते.

खाद्य : घार आकाशात उंचावरून घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते. खाद्य म्हणजे बेडूक, मासे, सरडे, मटन आदी

गिधाड - वंश : कणाधरी

शास्त्रीय नाव : cathartidae

खाद्य : मृतभक्षक वर्गातील पक्षी असून ते प्राण्यांच्या मृतदेहांवर जगतात. मुख्य खाद्य हे मृतदेहांचे मांस असते.

वर्णन: पिसे नसलेले केसरहित डोके हे बहुतांश गिधाडांचे वैशिष्ट्य आहे. हे निसर्गातील सफाई कर्मचारी असतात. अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत.

संख्या : गिधाडांची संख्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

बुलबुल - वर्णन : बुलबुल मध्यम आकारमानाचे थव्याने राहणारे, गोंगाट करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगाचे, लांब, मऊ आणि हलक्या पिसांचे पक्षी आहेत. चोच लहान ते मध्यम आकाराची बाकदार असते.
खाद्य : फळे, कीटक, मध.

आढळस्थान : बुलबुल आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी आणि पानांनी बनवतात. पक्ष्यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत दडवलेले असते.
पौरुषत्व संकटात : प्लास्टिकमुळे होतो प्रजननावर परिणाम