आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Environment, Hygiene, Women's Questions; Roads, Transport, Committed To Solve The Problem

पर्यावरण, स्वच्छता, महिलांच्या प्रश्नांना प्रतिसाद; रस्ते, वाहतूक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वृक्षतोड, कचरा, वाहतूक या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवर डीबी स्टारने या वर्षभरात वृत्तमालिका प्रसिद्ध करून जबाबदार लोकांचा कारभार उघड केला. महिलांशी संबधित प्रश्न, दारूचा महापूर यावर प्रकाश टाकला. एकीकडे वृत्त प्रसिद्ध करण्याबरोबरच अधिका-यांना भेटून त्यांना मदत करून प्रश्न मार्गी लावले, तर दुसरीकडे लोकसहभागातून अभियान राबवत बदलाची सुरुवात केली. तुमच्या सहकार्यामुळे काय बदल घडला आणि येत्या वर्षात काय करावे लागणार आहे याचा आढावा...


जलवर्ष 2013
दैनिक दिव्य मराठीने 2013 हे जलवर्ष म्हणून जाहीर केले. त्यानुसार पाणी बचतीबाबतच्या, जलसंवर्धनाच्या वेगवेगळ्या बातम्यांना वर्षभर जागा देण्यात आली. डीबी स्टारने फेब्रुवारीपासूनच भूजल उपशावर अभ्यासपूर्ण आणि थेट वृत्त प्रसिद्ध केले. एप्रिल महिन्यापासूनच वॉटर हार्वेस्टिंगचा विषय हाती घेतला. सुरुवातीला वॉटर हार्वेस्टिंगच्या नावावर पालिकेत कसे पाणी मुरत आहे हे आम्ही उघड केले. त्यानंतर आर्किटेक्ट स्वप्निल सराफ यांच्या मदतीने लोकांना स्वस्तात वॉटर हार्वेस्टिंग कसे करता येईल याचे मार्गदर्शन दिले. याशिवाय पाणी बचत आणि पाणी जमिनीत मुरण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना खास जागा देण्यात आली. त्यामुळे जागृती वाढली आहे.

अ‍ॅपेगिरी
मर्सिडीझला बीएमडब्ल्यूची साथ मिळणारे हे शहर जगभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र, येथील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था एकदम गावठी आहे. अ‍ॅपेचालकांनी तर कहर केला आहे. या सुसाट अ‍ॅपेंना आरटीओ आणि पोलिसांनीही कधी रेड सिग्नल दाखवलेला नाही. त्यात सार्वजनिक वाहतुकीचा बोºया वाजला आहे. इतक्यातच ‘अ‍ॅपेगिरी’ मालिका प्रसिद्ध केली. संबंधित सर्व विभागांना एकत्र बोलावून हा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील.

मिळून घडवूया बदल

लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या पत्रकारितेतील नवीन प्रवाह तुमची मर्जी चालल्याने भक्कम झाला. ‘डीबी स्टार म्हणजे दणका’ हे समीकरण कायम ठेवतच गेल्या वर्षभरात तुमच्या दैनिकाने ‘सकारात्मक बदलाचा मंच’ म्हणूनही काम केले. पर्यावरण, वाहतूक, स्वच्छता, व्यसनाधीनता, पर्यटन, मूलभूत सुविधा आणि महिलांचे संवेदनशील प्रश्न मांडले, दोषींवर कोरडे ओढले. सोबतच या स्थितीत बदलासाठी पुढाकार घेत जागरूक नागरिकांच्या मदतीने थेट काम केले. त्यात यश मिळत आहे. त्याचे श्रेय आमच्या सुजाण वाचकांनाच जाते. येत्या वर्षातदेखील हे काम सुरूच राहील. कारण आपल्याला शहरात बदल घडवून आणायचा आहे.. सर्वांनी मिळून...

शहरात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वृक्षतोड, डोंगर पोखरणे यावर डीबी स्टारने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले. दुसरीकडे लोकसहभागातून वृक्षारोपण महाअभियान राबवण्यात आले. डीबी स्टारग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून 16 जून ते 18 गस्ट या दोन महिन्यांत पाच टप्प्यांमध्ये शहरातील 16 संस्थांच्या मदतीने तब्बल 35 हजार 129 झाडांचे रोपण आणि वितरण करण्यात आले. ही झाडे जगवण्याचे काम औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरम, भारतीय क्रीडा प्रबोधिनी आणि विद्यापीठ करत आहे. यात जिल्हा प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले. महानगरपालिकेने मात्र टाळाटाळ केली. परिणामी शहरातील ग्रीन बेल्टवर वृक्षारोपण होऊ शकले नाही. पालिकेने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर येत्या वर्षात ग्रीन बेल्ट खºया अर्थाने ग्रीन होईल.


आकडे- 2 महिने, 5 टप्पे,16 संस्था, 35129 वृक्षांचे रोपण
तुमच्या डीबी स्टारने रोखठोक पत्रकारिता करत दणकेबाज वृत्त प्रसिद्ध केले. त्याबरोबरच महिलांच्या दृष्टीने नाजूक आणि फारशी चर्चा न होणारे गंभीर विषय मांडून पाठपुरावा केला. मासिक पाळीदरम्यान मुलींनी काळजी घेणे गरजेचे असते. स्वच्छतेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. यासाठी सॅनिटरी नॅपकीनचा वापर व्हायला हवा. मात्र, अज्ञान आणि सहज उपलब्धतेचा प्रश्न ही अडचण आहे. त्यामुळे आजही पारंपरिक पद्धतीचा वापर होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. याला सॅनिटरी नॅपकीनच्या व्हेंडिंग मशीन हा चांगला पर्याय आहे. बचत गट, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. या शिवाय स्तनदा मातांची सार्वजनिक ठिकाणी बाळाला दूध पाजताना कुचंबणा होते. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे सर्वत्र असे कक्ष सुरू करण्याची गरज आहे. हे दोन्ही विषय प्रसिद्ध करून जिल्हा परिषद, मनपा, जिल्हा प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा केला. मनपाच्या महिला आणि बालकल्याण विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत 10 व्हेंडिंग मशीन लावण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही एक प्रारंभ आहे.

स्वच्छसुंदर शहर अभियान

ऐतिहासिक औरंगाबाद शहर एक उद्योग आणि पर्यटननगरी आहे. मात्र, मनपाच्या कृपेने शहराचा ‘कचरा’ झाला आहे. स्वच्छता पंधरवड्यात अधिकारीपदाधिकाºयांची झाडाझडती घेतल्यानंतर आता स्वच्छसुंदर शहर अभियान राबवले जात आहे. एकीकडे मनपा कर्मचाºयांच्या डोक्यातील जळमटे काढतानाच शहरावासीयांची जबाबदारीही लक्षात आणून देणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे, तर लोकांना सोबत घेऊन प्रत्यक्ष कृती करणेही आवश्यक आहे. हेच काम डीबी स्टारने केले. राहुल इंगळेसारखा तरुण, आगलावे काकांसारखे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे शिवनेरी मित्रमंडळ आणि हरिपाठाचा बहाणा करून स्वच्छतेचा सत्संग करणाºया एन3 सिडकोतील महिलांची उदाहरणे आम्ही मांडली. त्यानंतर सर्वांना एकत्र आणून स्वच्छता अभियान राबवले जात आहे. यात आता दरदिवशी नवीन विभागांची भर पडत आहे. आणखी अनेक जागरूक नागरिकांच्या मदतीने शहराची बकाली दूर करण्याची मोहीम पुढेही सुरू राहील.

बेबंदशाही
कायद्याला कवडीमोल समजणे, दबंगगिरी करणे काय असते हे दारुड्यांचा शहरातील वावर पाहून कळते. वाट्टेल तेथे केव्हाही खुलेआम दारू पिण्याची सूट उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी दिली आहे. तुमच्या तक्रारींची दखल घेत आम्ही ही ‘बेबंदशाही’ उघड केली. साटेलोटे करून उत्पादन शुल्क, पोलिस, हॉटेल्स, दारूविक्रेते खासगी ‘उत्पादन’ वाढवत आहेत. वृत्तमालिकेनंतर एक्साइजने तोंडदेखली कारवाई केली, तर पोलिसांनी पुढाकार घेतला. मात्र, यात सातत्य राहणे गरजेचे आहे.

संजीवनी भेट अभियान
ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून वृक्षारोपण महाअभियान राबवल्यानंतर तुमच्या आरोग्यासाठी ‘संजीवनी भेट अभियान’ राबवण्यात आले. या माध्यमातून 5 हजार तुळशी रोपे आणि त्याचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका भेट दिली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनाही तुळस भेट देण्यात आली. त्यामुळे उद्योजक, कलावंत, क्रीडा संघटनांनी पाहुण्यांचे स्वागत तुळस किंवा इतर रोप देऊन करण्याचा प्रस्ताव संमत केला. क्सिजनचे प्रमाण वाढवणारी ही चमत्कारी वनस्पती शहरभर पोहोचण्याच्या दृष्टीने आम्ही सुरुवात केली आहे. ही साखळी वाढत जाईल यात शंका नाही