आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Environmental News In Marathi, Protecting Trees, Divya Marathi

झाडांसाठी वळवल्या भिंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गळणार्‍या पानांमुळे झाडण्याचा त्रास नको म्हणून अंगणातील, घराच्या कडेला असलेल्या झाडांवर कुर्‍हाड चालविल्याचे सर्वत्र घडते. मात्र, शहरातील काही वृक्षप्रेमींनी घराच्या आणि संरक्षण भिंतीला अडथळा ठरणारी झाडे तोडण्याऐवजी भिंतीच वळवून घेतल्या आहेत. त्यामुळे ही झाडे वाचू शकली आहेत.
जळगाव-धुळे महामार्गावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वॉलकम्पाउंडचे बांधकाम सुरू आहे. संस्थेच्या मालकीच्या जमिनीला कम्पाउंड करताना दोन झाडे अडसर ठरत आहेत. ही झाडे तोडून सरळ कम्पाउंड करण्याऐवजी संस्थेने झाडे वाचविण्यासाठी झाडापर्यंत सरळ आलेली कम्पाउंडची भिंत आतील बाजूने वळवून घेतली आहे. झाडाची वाढ होण्यासाठी पुरेशी जागा सोडण्यात आल्याने भविष्यात झाड आणि भिंत दोघांनाही एकमेकांपासून धोका राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच शिवकॉलनीतदेखील इंद्रजित ठाकरे यांनी झाड वाचविण्यासाठी असाच प्रयोग केला आहे.
दोन्ही ठिकाणी असलेली झाडे वाचविण्यासाठी संस्थेचा कम्पाउंड वळविण्याचा प्रयत्न प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया वृक्षप्रेमींकडून येत आहेत. मार्गावर दुरवरून झाडांसाठी वळविलेले कम्पाउंड दृष्टिक्षेपास पडते. झाडांना बाहेरील बाजूने जागा सोडताना कम्पाउंड आतल्या बाजूने वळविण्यात आले आहे.