आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Equal Water Dispute Hearing Cancelled By Aurangabad High Court Bench

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समन्यायी पाणीवाटपाच्या सुनावणीस औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - समन्यायी पाणीवाटपासंबंधी औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकांची सुनावणी न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती ए. आय. एस. चिमा यांनी सोमवारी (12 ऑगस्ट) स्थगित केली.


याचिका अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सुनावणीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश पारित केले. या आदेशासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील सरकारी वकिलांनी दिलेले पत्र खंडपीठातील सरकारी वकील सुनील कुरुंदकर यांनी खंडपीठासमोर ठेवले. या पत्रात समन्यायी पाणीवाटपासंबंधी उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे सुरू असलेली विविध याचिकांची सुनावणी स्थगित करण्याचे म्हटले आहे. यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी निर्णय घ्यावा. दोन्हीकडे सुरू असलेली सुनावणी स्थगित करण्यात यावी. या पत्राची नोंद घेत खंडपीठाने सुनावणी स्थगित केली. प्रकरणांच्या सुनावणीचे भवितव्य आता मुख्य न्यायमूर्तींच्या निर्णयावर अवलंबून आहे. खंडपीठात मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने अँड. प्रदीप देशमुख यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या वतीने अँड. अनिल बजाज काम पाहत आहेत. कोपरगाव साखर कारखाना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सतनामसिंग गुलाटी यांनीही याचिका दाखल केली आहे. याशिवाय चार हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मराठवाडा जनता विकास परिषदेने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी (13 ऑगस्ट) स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र नागेश्वरवाडी येथे दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.