आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Equal Water In All Dams This Priciple Consider High Court

‘सर्व धरणांत समान पाणी’ या तत्त्वाचा विचार व्हावा - उच्च न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्व धरणांमध्ये समान पाणी ठेवण्याच्या तत्त्वाचा विचार व्हावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध करणा-या याचिकांच्या सुनावणीदरम्यान केली.
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी 29 ऑक्टोबरला निळवंडे (जि. नगर) धरणातून 9.5 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यास नगर जिल्ह्यातील काही लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर 13 नोव्हेंबरला जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता बी. सी. कुंजीर यांनी म्हणणे सादर केले. निळवंडेतील पाणी प्रवरा नदी, प्रवरा कालवा व जायकवाडीच्या वापरासाठी राखून ठेवले आहे, असे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. यावर अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी आक्षेप घेतला. जलसंपदामंत्र्यांनी घेतलेला निर्णय मुख्य अभियंता फिरवू शकत नाहीत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कलम 12 (3) (ग) नुसार पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे. निळवंडेतून 5 टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले पाहिजे, असा युक्तिवाद त्यांनी केला.