आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - गोदापात्रातील पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी शासनाने नेमलेल्या हिरालाल मेंढेगिरी समितीचा अहवाल तयार असून येत्या आठ दिवसांत तो शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
गोदावरीच्या पाण्याचे नाशिक ते नांदेडपर्यंत समन्यायी पाणी वाटप होत नसल्याने मराठवाड्याला यंदा दुष्काळाचा सामना करावा लागला. नाशिकमधील धरणे भरल्यानंतर पाणी मराठवाड्यात सोडले जाते. दोन वर्षांपासून अवर्षणामुळे मराठवाड्यातील धरणे कोरडी पडली. मात्र, नाशिकच्या धरणांमध्ये मुबलक पाणी होते. त्यानंतर राज्य सरकारने वाल्मी या जलव्यवस्थापन संस्थेचे प्रमुख मेंढेगिरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीने समन्यायी पाणी वाटपासाठी अभ्यास करून अहवाल तयार केला. नाशिक ते नांदेडपर्यंत समप्रमाणात पाणी मिळण्यासाठी अहवालात विशेष सूचना असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. यंदाही मराठवाड्यातील धरणे कोरडी राहिल्यास नदीवरील धरणांत असलेले पाणी मराठवाड्यासाठी सोडण्याची शिफारसही अहवालात असून यामुळे सर्वच धरणांत समप्रमाणात पाणी राहू शकते, असेही सूत्रांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.