आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Esi Problem At Aurangabad, No Doctor, Patient, Worker

इएसआयमध्ये गैरसोय; डॉक्टर आणि कर्मचारी कमी, रुग्णांचे हाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने इएसआयचा कायदा अमलात आणला, पण त्याचा फायदा कामगारांना होत नसल्याचे चित्र आहे. कामगार व शासकीय कर्मचार्‍यांच्या वेतनातून आरोग्य सुविधांसाठी रक्कम कपात केली जाते. मात्र, अद्ययावत यंत्रणा नसल्याने कर्मचार्‍यांना पैसे मोजूनही उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो.
इएसआयसी योजनेमध्ये समाविष्ट कर्मचार्‍यांच्या पगारातून शंभर रुपयांमागे एक रुपया पंचाहत्तर पैसे कपात केले जातात, तर मालकाकडून चार रुपये 75 पैसे घेतले जातात. त्या मोबदल्यात इएसआयसी हॉस्पिटल कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व आजारांवर सेवा पुरवते, परंतु इएसआयसीकडे कर्मचारी संख्या कमी आहे. गरजेपेक्षा सध्या तज्ज्ञ डॉक्टर 25 टक्के, नर्स 50 टक्के तर इतर कर्मचारी 34 टक्क्यांनी कमी असल्याचे चित्र आहे.
10 खासगी रुग्णालयांशी करार, पण उपयोग नाही
इएसआय रु ग्णालयात सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे शहरातील नामांकित 10 रुग्णालयांशी करार करण्यात आला आहे. त्यात माणिक, सुमनांजली, सिग्मा, सासवडे, सिटीकेअर, धूत, एमजीएम, दंडे, नेहा, दुनाखे या रुग्णालयांचा समावेश आहे, पण या रुग्णालयांतर्फेही रुग्णांकडून पैशांची मागणी केली जाते.
खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास 10 हजार रुपयांपर्यंतचा खर्च इएसआयसी हॉस्पिटल करते, 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मुंबई कार्यालयातर्फे आणि 25 हजारांच्या पुढील खर्च आरोग्य मंत्रालयाकडून मंजूर करून आणावा लागतो, पण ही रक्कम मिळविण्यासाठी कर्मचार्‍यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. अनेकदा ती रक्कम मिळतच नाही, अशी माहिती राज्य कामगार विमा योजना संघर्ष समितीचे सचिव विनोद फरकाडे यांनी ही माहिती दिली.