आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा दवाखाना सज्ज, तरीही ‘आजारी’ इमारतीत उपचार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयावर वाळूज येथील ईएसआयसी (एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन) रुग्णालयाच्या धोकादायक इमारतीत उपचार केले जात आहेत. मात्र इएसआयसीची क ोट्यवधी रुपये खर्च क रून बांधलेली इमारत गेल्या अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळखात पडून आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या टोलवाटोलवीमुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीत सुमारे 1 हजार 300 वर लहान-मोठे क ारखाने आहेत. या कारखान्यांतील हजारो कामगार ईएसआयसीशी संबंधित आहेत. ईएसआयसीचे परिसरात सुमारे पाऊण लाखांवर सभासद आहेत. या आदर्श औषधालय व निदान केंद्राशी संबंधित असलेल्या लाभधारकांची संख्या सुमारे 1 लाख 25 हजारांवर आहे. या लाभधारकांना वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील दवाखान्यात आरोग्य सेवा दिली जाते. परिसरातील काही खासगी रुग्णालयांशीही ईएसआयसीचा सहकार्य करार आहे. तेथेही कामगार व त्यांच्या पाल्यांना आरोग्यसेवा दिली जाते.

कोट्यवधींचा खर्च क रून मॉडेल डिस्पेंन्सरी
कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी ईएसआयसीच्यावतीने वाळूज एमआयडीसीमध्ये खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रयत्नाने कोट्यवधी रुपये खर्च क रून आदर्श औषधालय व निदान केंद्राच्या भव्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीवरील खर्चाबाबत ईएसआयसीचे अतिरिक्त संचालक डी.टी.उंदिरवाडे यांनी असर्मथता व्यक्त केली. या इमारतीचे काम पूर्ण होऊन मोठा कालावधी उलटला, तरी तिच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त सापडेना.

हलगर्जीपणा कारणीभूत
इएसआयसीच्या प्रत्येक बैठकीत नव्या मॉडेल डिस्पेन्सरीमध्ये सध्याची डिस्पेन्सरी हलविण्याची मागणी करीत आलो आहोत. तेथे डॉक्टर व नर्सेसचा स्टाफ वाढवून ती 24 तास उघडी ठेवावी. क ारण कंपन्या रात्रीही सुरू असतात. कामगारांना कायम यंत्रासोबत काम करावे लागत असल्याने केव्हा अपघात होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे स्थलांतर लवकर व्हावे, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली. मात्र, अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे स्थलांतरण रखडले आहे. बुद्धिनाथ बराळ, मेंबर, ईएसआय स्थानिक कमिटी व आयटक कामगार नेते

वरिष्ठांकडे अहवाल सादर
सध्याच्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या इमारतीवर मोबाइल टॉवर असून तो धोकादायक ठरत आहे. तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणेही शक्य होत नाही. मात्र, नाईलाजाने उपचार करणे भाग पडत आहे. त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. डॉ.पृथ्वीराज राठोड, मुख्य प्रभारी, इएसआय डिस्पेन्सरी

सर्टिफिकेट मिळणे बाकी
इएसआयसीच्या नव्या इमारतीचे बांधकाम अगदी वेळेत व दज्रेदार झाले आहे. मात्र, इमारत बांधकामाबाबत चिकलठाणा एमआयडीसीकडून कम्प्लेशन सर्टिफिकेट येणे बाकी आहे. औरंगाबाद विभागीय कार्यालयातील डी.टी.उंदिरवाडे यांच्याकडे याबाबत संपूर्ण माहिती आहे. परंतु त्यांनी माहिती देण्यास का टाळाटाळ केली? हे कळण्यास मार्ग नाही. अशोककुमार यादव, इएसआयसी, दिल्ली मुख्यालय अधिकारी