आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपियन कमिशनचा राज्यात पहिला यूथ पास औरंगाबादेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - युरोपीयदेशांत शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याकरिता युरोपियन कमिशनकडून विश्वासार्ह संस्थेची अधिकृत प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली जाते, त्यांना यूथ पास दिला जातो. महाराष्ट्रात प्रथमच औरंगाबादेतील दिशा इंंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्टला यूथ पास मिळाला आहे. यामुळे विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना युरोपियन समूहातील २८ देशांत इंटर्नशिप, उच्च शिक्षण आणि संशोधनाचा मार्ग सोपा झाला असून दिशा ट्रस्टमार्फत विद्यार्थ्यांना युरोपीय देशांत जाण्याची संधी मिळणार आहे.
युरोपियन कमिशनच्या वतीने इरॉसमस प्लस ही युवक विकास आणि रोजगाराच्या संधी या विषयावरील परिषद घेतली जाते. यंदा १६ ते २७ जुलैदरम्यान इटलीतील बोलिना सिटीत ही परिषद झाली. परिषदेसाठी जगभरातील १३२ संस्थांनी अर्ज केले होते. पैकी १३ देशांतील प्रत्येकी तीन प्रतिनिधी अशा ३९ जणांना निमंत्रित करण्यात आले. भारताचे प्रतिनिधित्व औरंगाबादच्या दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्टने केले. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष किरॉन वैष्णव, राम मर्लापल्ले आणि अनुराग कल्याणी यात सहभागी झाले. किरॉन यांनी बिल्डिंग एम्पाॅवरिंग एव्हायर्नमेंट फॉर यूथ एम्प्लॉयबिलिटी हा प्रकल्प मांडला.

संधीची देवाणघेवाण : इटलीहूनपरतल्यावर किरॉन आणि त्यांच्या टीमनेे युवक विकासाच्या दिशेने काम सुरू केले. तरुणांमधील कौशल्य विकासासाठी विद्यापीठ, महाविद्यालये आणि अन्य खासगी संस्थांमध्ये कार्यशाळा घेतल्या. मुलांना संभाषण कौशल्य, इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्त्व विकास, गटचर्चा आदींचे प्रशिक्षण दिले. याचा अहवाल इरॉसमस प्लसला पाठवला. त्यानंतर १३ पैकी भारत, इटली, केनिया, ब्राझील आणि लुत्सानिया या देशांतील प्रतिनिधींना पुढील कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले. ते १९ ऑक्टोबरदरम्यान ही कार्यशाळा झाली. सदस्यांनी इटलीतील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, उद्योगांना भेटी देऊन तेथील आवश्यक कौशल्याची माहिती घेतली. अॅस्टर चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांसोबत चर्चा केली, युरोप आणि भारतातील संधीची देवाणघेवाण केली.

याविद्यार्थ्यांना संधी : जगभरातीलतरुणांना युराेपियन देशांतील शिक्षणाच्या नवनवीन संधींचा लाभ मिळावा, यासाठी युरोपियन कमिशनच्या वतीने युवक विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना यूथ पास दिला जातो. महाराष्ट्रात प्रथमच असा यूथ पास मिळवण्याचा बहुमान दिशा इंटरनॅशनल ट्रस्ट फाउंडेशनला मिळाला. यामुळे इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमंेट पर्यटन व्यवस्थापन, अकाउंटिंग, मार्केटिंग, एचआर, मॅकाट्राॅनिक्स आदी विषयांतील विद्यार्थ्यांना युरोपियन देशांत ३५ ते ९० दिवसांची इंटर्नशिप करणे तसेच या विषयातील उच्च शिक्षण घेणे किंवा संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी युरोपियन कमिशनच्या युनेट आणि दिशा या दोन संस्थांत सामंजस्य करार झाला आहे.

ऑक्टोबर महिन्यात इटली येथे झालेल्या कार्यशाळेत अन्य देशांच्या प्रतिनिधींसमवेत किरॉन वैष्णव.

औरंगाबादचा बहुमान
युवकआणिमनुष्यबळ विकास क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या संस्थांना युरोपियन कमिशनतर्फे यूथ पास दिला जातो. हा पास मिळणे हा आमच्या संस्थेसह औैरंगाबाद शहराचा बहुमान आहे. -किरॉन वैष्णव, दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्ट

इंटर्नशिपसाठी मिळेल मानधन
उच्च शिक्षणासाठी युरोपात जाऊ इच्छिणाऱ्यांना प्रवासखर्च करावा लागेल. उर्वरित खर्च इरॉसमस प्लस करेल. इंटर्नशिपसाठी मानधन दिले जाते, अधिक माहितीसाठी www.disha-ngo.in या संकेतस्थळावर संपर्क करावा, असेही वैष्णव म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...