आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eve Of Ambedkar Birth Anivarsary Tension In Anad Village, Atrocity On 14 Men

आंबेडकर जयंतीच्या पूर्व संध्‍याला अनाड गावात वाद, 14 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा - अनाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झेंडा उभारण्यावरून दोन गटांत वाद झाला. या प्रकरणी चौदा जणांवर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवार, 12 रोजी रात्री पावणेनऊ वाजता ही घटना घडली. शनिवारी गावात दिवसभर तणाव होता. खबरदारीचा उपाय म्हणून गावात दिवसभर पोलिस तळ ठोकून होते.

अनाड येथे अजित यशवंता सोनवणे यांच्या राहत्या घरासमोर दीपक अशोक बिरारे झेंडा उभारण्याचे काम करत होते. या वेळी गावातील काहींनी त्यास विरोध केला. यावरून दोन्ही गटांत दगडफेक झाली. दीपक बिरारे यांच्या फिर्यादीवरून मोतीसिंह रामराव पवार, चरणसिंह रामसिहजाधव, युवराजसिंह रामभाऊ जाधव, कुलदीपसिंह भास्करसिंह पवार, संदीप सदाशिव महाले, सचिन युवराजसिंह पवार, प्रवीण तुकाराम जाधव, अजित रमेश कच्छवा, अमोल जयसिंह पवार, वैभव दिनकर पवार, गोपाल रमेश पवार, सत्यपाल अमरसिंह पवार, जीवन रामभाऊ पवार, संदीप मोतीराम पवार यांच्याविरोधात अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी शैलेश बलकवडे, अजिंठय़ाचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटनास्थळी भेट दिली.

सर्व आरोपींना आम्ही अटक केली असून रविवारी 14 रोजी त्यांना कोर्टात हजर केले जाईल. शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी

वर्षांपूर्वीही झाला होता वाद
गावात झेंड्यावरून पाच वर्षांपूर्वी दोन गटांत वाद झाला होता. मात्र, गावातील नागरिकांना मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. तेव्हापासून गावात शांतता होती; परंतु आता पुन्हा वाद उफाळून आला आहे.