आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौलताबाद किल्ल्यातील अंधाऱ्या खोलीत फ्रान्सच्या महिला पर्यटकांसोबत छेडछाड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दौलताबाद - दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी फ्रान्समधून आलेल्या पर्यटकांची शुक्रवारी किल्ल्यातील अंधार असलेल्या भागात मवाल्यांनी छेड काढल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
या महिलांनी लगेच किल्ल्यातील पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्याने वाॅकीटाॅकीवरून बारादरी परिसरात पहारा देणारे कर्मचारी लक्ष्मण राठोड यांना किल्ल्यात छेडछाड झाल्याचे कळविले. मग तत्काळ शोधाशोध सुरू झाली. मात्र, किल्ल्यात पर्यटकांची मोठी गर्दी होती. शिवाय अंधार असल्यामुळे नेमकी छेड कुणी काढली हे कळू शकले नाही. ही माहिती पर्यटन विभागाने पोलिस कंट्रोल रूमला माहिती दिली. या कर्मचाऱ्यांनी विदेशी पर्यटक येमा क्रिस्टन, आगेता बाऊत, सेलीज दे सेज,आलिया डेलिग, बापारिस सैभा, यांना सुरक्षा देत दौलताबाद किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत आणून सोडले. दौलताबाद ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पर्यटक महिला बापारिस सैभा यांनी पोलिसांना सांगितले की, माझ्या मैत्रिणीचे एका तरुणाने पाठीमागून केस ओढले आणि दगड मारले. पोलिस आणि किल्ला व्यवस्थापनाने वेळीच दखल घेतल्यामुळे विदेशी पर्यटकांनी त्यांचे अाभार मानले.
बातम्या आणखी आहेत...