आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हानांशी झुंजण्याची जिद्द ठरली "एव्हरेस्ट'पेक्षा उत्तुंग !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निसर्गाच्या तांडवामुळे एव्हरेस्ट मोहीम दोन वेळा रद्द झाली. तेव्हाच मृत्यूशी नजरानजर झाली होती, कसाबसा जीव वाचला. हे शिखर सर करायचेच या ध्येयाने तिसऱ्यांदा केलेला प्रयत्न यशस्वी झाला. कठीण स्थिती अन् कडवे आव्हान दिसताच संचारणारा उत्साहच अखेरच्या क्षणी कामी आला, अशी भावना एव्हरेस्टवीर शेख रफिकने व्यक्त केली.
एव्हरेस्टवर भारताचा आणि पोलिस दलाचा झेंडा फडकवणाऱ्या रफिकचे बुधवारी (८ जून) चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. तिथे पोलिस दलासह मित्रपरिवार अन् चाहत्यांनी केलेल्या जंगी स्वागतानंतर रफिक भावुक झाला. यानंतर विमानतळ ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत रॅलीही काढण्यात आली.

रफिक म्हणाला, तिसऱ्यांदा एव्हरेस्ट मोहीम सुरू करताना काही वेळ मानसिक तणाव होता. वर्षभरानंतर बर्फाळ प्रदेशात गेल्यावर त्या वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. गत दोन वेळचा अनुभव पाहता मनात भीतीही होती. मे रोजी बेस कॅम्पच्या चढाईला सुरुवात केली. पहिल्या कॅम्पवर जाता थेट दुसरा कॅम्प गाठला. त्यानंतर तिसरा, चौथा कॅम्प जवळ केला. येथे सर्वात कठीण भाग समोर असतो. शेवटच्या टप्प्यात तुम्ही थकलेले असता. तिथेच कसोटी लागते, असेही त्याने सांगितले.

शनिवारी जाहीर सत्कार : ११जून रोजी रफिकचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. सिडको येथील संत तुकाराम नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार असून राज्यभरातील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

इतरांसाठी प्रेरणा
^रफिक आता इतरांसाठी प्रेरणा बनला असून तो यूथ आयकॉन झाला आहे. आम्ही त्याला सर्वताेपरी मदत केली, यापुढेही करत राहू. मेहनतीचे फळ त्याला मिळाले. कुटुंबीय, मित्रपरिवाराने त्याला चांगली साथ दिली. - नवीनचंद्र रेड्डी, पोलिसअधीक्षक

^वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, असेच रफिकच्या बाबतीत घडले. त्याला काहीही बोला तो पुन्हा एव्हरेस्टच्याच विषयावर येईल. त्याच्या डोक्यात एकच विचार होता, तो म्हणजे एव्हरेस्ट. या विचाराने झपाटल्यानेच त्याने मोठी उंची गाठली आहे. - हरीश जाखेटे, रफिकचेमार्गदर्शक

मोठी उंची गाठली अखेर शिखर गाठले
१८ मे रोजी रात्री वाजता अखेरच्या टप्प्यातील चढाईला सुरुवात केली. सोबत जास्तीचे ऑक्सिजन सिलिंडर घेतले होते. शेवटचा टप्पा म्हणजे डेथ झोन, कारण येथे अनेक एव्हरेस्टवीरांचा मृत्यू झाला आहे. अनेकांना येथूनच परतावे लागते. येथेच माझा सहकारी शेर्पाच्या पायात पाणी झाले अन् ताे परतला. शिखरापासून मी फक्त पाच मीटर दूर होतो. थोडे उजाडल्यासारखे वातावरण होते. काय झाले ते नेमके कळाले नाही, पण मी धावत सुटलो आणि शिखर गाठले. १५ मिनिटे वर थांबलो, त्या वेळी अक्षरश: रडू कोसळले. बराच वेळाने परतीची वाट धरली. शिखरावरून परतणेही सोपे नसते. कारण अन्न-पाणी संपलेले असते, थकवा असतो, असा अनुभव त्याने सांगितला.
बातम्या आणखी आहेत...