आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हीएमच्या तपासणीत तांत्रिक दोष, प्रशासन दुरुस्ती करणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनपैकी (ईव्हीएम) 368 मशीनमध्ये बिघाड दिसून आला. त्यामुळे या ‘ईव्हीएम’ तातडीने दुरुस्त करण्याचे काम प्रशासनाला हाती घ्यावे लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीत ही बाब समोर आली.
जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होत आहेत. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून बुधवारी ‘ईव्हीएम’ची तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात 2700 मशीन तर किलेअर्कमध्ये 6800 मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तपासणीनंतर यातील 368 मशीनमध्ये तांत्रिक दोष असल्याचे दिसून आले. लवकरच हे दोष दुरुस्त करून मशीन उपयोगात येतील, असे एका अधिका-याने सांगितले.
फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितींची निवडणूक होत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सुरुवातीपासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. मतदारांची यादी तयार करणे, मतदान केंद्र ठरविणे, अधिका-यांची नियुक्ती, सुरक्षा यासह आदर्श आचारसंहितेचे पालन या बाबींवर कार्यवाही सुरू आहे.