आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Evm Machines In Aurangabad For Vidhansabha Election 2014

हरिद्वारहून ईव्हीएम येण्यास सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांसाठी सात हजार मतदान यंत्रांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात ती उपलब्ध नसल्यामुळे हरिद्वार आणि डेहराडून येथून ती मागवण्यात आली होती. ही यंत्रे बुधवारपासून शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली. दोन दिवसांत सर्व यंत्रे दाखल होणार असून उद्यापासून (शुक्रवार) त्यांची प्राथमिक तपासणी होणार आहे.

ही सर्व यंत्रे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात ठेवण्यात आली आहेत. पदवीधर निवडणुकीची मतमोजणी जेथे झाली होती, तेथेच ही यंत्रे राहणार असून प्राथमिक तपासणीनंतर आणखी तीन तपासण्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी केंद्राचे तज्ज्ञ शहरात तळ ठोकून राहणार आहेत.
पर्यायी व्यवस्था
जिल्ह्यात अडीच हजारांवर मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार एवढी मतदान यंत्रे लागणार आहेत. मात्र, काही ठिकाणी उमेदवार वाढले, तर यंत्रे दुप्पट लागतील म्हणून हा खटाटोप करण्यात येत आहे. शिवाय तपासणीत काही यंत्रे नादुरुस्त आढळली किंवा मतदानाच्या वेळी यंत्रांमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था करून ठेवण्यात येणार आहे.