आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी सैनिकांना दुहेरी निवृत्तिवेतन मिळणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - माजी सैनिकांच्या पेन्शनमध्ये सुधारणासंबंधीचा 1982 पासून प्रलंबित असलेला प्रश्न केंद्रीय संरक्षण विभागाने निकाली काढला आहे. नवीन सुधारित पेन्शन योजना 24 सप्टेंबर 2012 पासून लागू केल्याने राज्यातील दोन लाखांवर माजी सैनिक व 3.5 हजार निवृत्त अधिका-यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील 4 हजारांवर माजी सैनिकही लाभार्थी आहेत.

‘वन रँक वन पेन्शन’ योजना संरक्षण दलातील निवृत्त सैनिकांसाठी अमलात आणावी यासाठी 1982 पासून देशात मागणी केली जात होती. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनाही माजी सैनिकांनी निवेदन देऊन पदव्या व चक्र परत केले होते. संरक्षण विभागाने वन रँक वन पेन्शन योजना लागू केली नसली तरी नवीन सुधारणांमुळे उपरोक्त योजनेच्या समकक्ष नवीन सुधारणा 17 जानेवारीला जाहीर करून प्रजासत्ताक दिनाची भेट दिली आहे.
दुहेरी पेन्शन योजनेस मान्यता: यापूर्वी संरक्षण दलातून निवृत्त होणा-या कर्मचा-या स इतर विभागात नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयास कुठल्याही एकाच योजनेचा लाभ घेण्यासंबंधी विचारणा केली जात होती. नवीन योजनेनुसार संरक्षण दलातून निवृत्त झाल्यानंतर माजी सैनिक नागरी विभागात सेवा करत असेल तर त्याच्या कुटुंबास आता दोन्ही विभागांचे पेन्शन मिळेल. उदा: त्याच्या अपघाती निधनानंतर उपरोक्त पेन्शन नियमानुसार त्याच्या कुटुंबाला देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

चार स्तरावर विभागणी
सुधारित योजनेत सेवाकालावधीला महत्त्व देऊन निवृत्ती वेतनात एकसमानता आणण्यात आली आहे. यात चार टप्प्यात कर्मचा-यांची विभागणी करण्यात आली आहे. सैनिक, कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी, इतर रँक व कमिशन्ड अधिकारी अशी विभागणी केली आहे.