आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Mla Sandipan Bhumare Of Shiv Sena Meet Udhav Thackeray

भुमरे म्हणतात नाराजी दूर; उद्धव ठाकरेंसोबत अर्धा तास चर्चा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण: पक्षनिर्णयात डावलल्याचे कारण पुढे करून खासदार चंद्रकांत खैरेंवर जाहीर टीकेची झोड उठवणारे माजी आमदार संदिपान भुमरे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली बाजू मांडली. ठाकरे यांनी नाराजी दूर केली आहे. मी शिवसेनेतच राहणार असून खैरेसोबतचा वाद संपुष्टात आला असल्याचेही भुमरे म्हणाले.
पक्षनिर्णयात खासदार खैरे यांच्याकडून डावलण्यात आल्याचा आरोप भुमरे यांनी केला होता. जाहीर मेळाव्यात खैरेंवर टीकेची झोड उठवून वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत भुमरे होते. दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते विश्वनाथ नेरुरकर यांची भेटही त्यांनी घेतली होती. माफी न मागण्याच्या भूमिकेवर भुमरे ठाम होते. दरम्यान, भुमरे यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता ‘मातोर्शी’वर हजेरी लावली. अर्धा तास त्यांनी ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. ठाकरे यांनीही भुमरे यांचे म्हणणे ऐकून घेत नाराजी दूर केल्याची माहिती भुमरे यांनी दिली.
एकदिलाने काम करू
संदिपान भुमरे यांनी विश्वनाथ नेरूरकर यांच्याकडे माफी मागितली होती. तीन दिवसांपूर्वी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत याप्रकरणी चर्चा झाली होती. नेरूरकर आणि मातोर्शीवर भुमरे सरेंडर झाले. माझा कोणताही वाद संदिपान भुमरे यांच्यासोबत नव्हता. त्यामुळे दोघे मिळून शिवसेना वाढीसाठ एकदिलाने काम करू. आगामी मेळाव्यासाठी भुमरेंची हजेरी राहील. आता या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. चंद्रकांत खैरे, खासदार