आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कारसेवांचे दोन अनुभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९८९ ते १९९२ हा सावे यांच्या जीवनातील सर्वात संघर्षाचा त्यांना राजकारणात वेगळे स्थान निर्माण करून देणारा काळ होता. बाबरी मशिदीच्या पतनासाठी गेलेल्या शिवसैनिकांच्या एका तुकडीचे नेतृत्व त्यांनी केले होते. त्या आठवणी गौरवांकात शब्दबद्ध केल्या होत्या.
मोरेश्वर सावे यांचा राजकारणाच्या पटलावरील उदय झाला तो त्यांनी १९८९ मध्ये औरंगाबादच्या महापौरपदाची निवडणूक िजंकल्यावर. केवळ एका मताने सावे विजयी झाले होते. त्यासाठी त्यांना न्यायालयात लढाईही लढावी लागली. त्यात सावे यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. संतोष बोरा यांनी त्या काळातील घडामोडींचा वेध एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या सावेंवरील गौरव अंकात घेतला होता. त्यातील संपादित अंश...
१९८९ मध्ये नवव्या लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर सर्वसाधारणपणे जल्लोषाचे वातावरण होते. त्याचे कारण स्वातंत्र्यानंतर प्रथमच शिवसेनेचे चार खासदार निवडून आले होते. याच काळात विश्व िहंदू परिषदेतर्फे प्रथम कारसेवेची घोषणा झाली. मग आम्ही मंडळींनी बाळासाहेबांकडे परवानगी मागितली, परंतु शेवटच्या वेळेपर्यंत आम्ही परवानगी मिळवू शकलो नाही. परिणामत: मी आणि खासदार विद्याधरजी गोखले यांनी कारसेवेमध्ये सहभागी होण्याचे ठरविले. सोबत रमाकांत पांडे नावाचे पत्रकार एक कार्यकर्ता असे चार जण आम्ही जुन्या दिल्लीवरून अयोध्येकडे रवाना झालो. आम्ही दोघे जण खासदार आहोत हे जाहीर होऊ नये, अशा दृष्टिकोनातून गाडी रवाना होण्यापूर्वी रेल्वे डब्यावरील आमचे रिझर्व्हेशन आम्ही फाडून टाकले. त्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंगजी यादव यांनी सर्व प्रकारचे अडथळे निर्माण केले होते. आमची रेल्वे सुलतानपूर स्टेशनवर पोहोचल्यावर आम्हाला सांगण्यात आले की, ही गाडी फैजाबाद, अयोध्यामार्गे जाणार नाही. आम्ही सुलतानपूर स्टेशनच्या थोडेसे अगोदर उतरलो. त्या वेळेस सकाळ झाली होती. चहावाल्याशी बोलताना असे लक्षात आले की, अयोध्या तेथून खूप लांब आहे आणि कुठल्याही प्रकारचे थेट वाहन आम्हाला मिळू शकणार नाही. सुदैवाने तेथे काही सायकल रिक्षा उभ्या होत्या आणि सुमारे १५ किलोमीटरपर्यंत त्याने आम्हाला नेण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे आम्ही चौघे जण सुलतानपूरहून सुमारे १५ कि.मी.वर असलेल्या कुडेबहार नावाच्या गावात पोहोचलो. त्यानंतर रिक्षावाल्याने पुढे जाण्यास नकार दिला. गोखले साहेबांना पान खाण्याची सवय होती. पान खरेदी करत असताना त्यांचे लक्ष दुकानामध्ये लावलेल्या विविध फाेटाेंकडे गेले. त्यावरून त्यांच्या हे लक्षात अाले की हा दुकानदार राम-हनुमानावर प्रेम करणारा अाहे. दुकानावरची गर्दी कमी हाेईपर्यंत गाेखले साहेब तेथे थांबले गर्दी कमी झाल्यानंतर त्यांनी हळूच विषय काढला की या येथून अयाेध्येला कसे पाेहोचायचे? त्या दुकानदाराने थांबण्याची सूचना केली काही वेळानंतर जवळच्याच अाैषधाच्या दुकानावर जाऊन बसण्याची सूचना केली. त्याच्या सूचनेप्रमाणे अाम्ही सर्व मंडळी अाैषधाच्या दुकानासमाेरील बाकावर जाऊन बसलाे. काही काळाने एक गृहस्थ अामच्या शेजारी येऊन बसला. अाम्हास त्याने खुणेने काही अंतरावर असलेल्या मंदिराकडे जाण्याची सूचना केली. अाम्ही मागचा पुढचा विचार करता त्या मंदिरात गेलाे. तेथे गेल्यानंतर अाम्हास अाश्चर्याचा धक्का बसला. कारण मंदिरातील विस्तीर्ण भागामध्ये माेठमाेठ्या कढया त्यामध्ये शिजवले जाणारे अन्न २०० ते ३०० कारसेवकांसाठी होते. दुसऱ्या दिवशी अाम्हाला अयाेध्येत पाेहोचणे कार्यक्रमानुसार अावश्यक हाेते. तितक्यात एका गृहस्थाने अाम्हाला सूचना केली की अाम्ही काेण अाहाेत, हे उघड करायचे नाही. काही वेळानंतर दाराशी पाेलिसांची जीप येऊन उभी राहिली. त्यांनी अाम्ही काेण अाहाेत, अशी विचारणा सुरू केली. त्याचे कारण अाम्हा चारही लाेकांचे वेश इतर लाेकांपेक्षा वेगळे हाेते. अाम्ही काहीतरी सांगून पाेलिसांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सुमारे दाेन तास ते जीप घेऊन तेथेच उभे राहिले. काही वेळाने पाेलिसवाले निघून गेल्यावर तेथील मंडळींनी भोजन, निवासाची व्यवस्था केली. पहाटेच्या चार वाजता दाेन गृहस्थांनी येऊन अाम्हाला जागे केले अाणि एक माेटारसायकल अाणि एका स्कूटरवर जावयाचे असे सांगितले. सुमारे दाेन तास प्रवास केल्यानंतर एक माेठेसे गाव लागले.
त्या ठिकाणी एका भाजप नेत्याच्या घरी अाम्हाला चहा देण्यात अाला. तेथून काही अंतरावर रेल्वेस्टेशनवर अाम्हाला नेण्यात अाले. थाेड्याच वेळात एक गुड्स ट्रेन फैजाबादमार्गे अयाेध्येकडे जाणारी अाली, परंतु सर्वसाधारण सूचनेनुसार ती रेल्वे तेथे थांबणार नव्हती. परंतु रेल्वेला जे रिंगटाइप टाेकन द्यायचे असते, त्या माणसाला बाजूला थांबवण्यात अाले. परिणामत: गाडी पुढील सिग्नल मिळाल्यामुळे तेथे थांबली, परंतु सर्व डबे वॅगन लाॅक केलेले हाेते. अाम्ही सर्व चारी मंडळी गार्डच्या डब्याकडे रवाना झालाे. डब्यातील मंडळींनी त्यांचा जेवणाचा डबा उघडला आणि आम्हास खावयास सांगितले. तुम्ही सर्व मंडळी इतक्या लांबून रामललासाठी आमच्या प्रांतात आला म्हणून तुमचे आदरातिथ्य करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले. फैजाबादला पोहोचल्यानंतर सांगण्यात आले की ही गाडी अयोध्येपर्यंत जाणार नाही. मग स्थानिक मंडळींकडून पाहुणचार स्वीकारून दुसऱ्या रेल्वेने आम्ही अयाेध्येस पोहोचलो. तेथे सभेसमोर आम्ही दोघांनी भाषणे केल्याने आमच्या आगमनाची उपस्थितीची शासनाला माहिती मिळाली. सभेतून बाहेर पडल्याबरोबर आमच्यासमोर तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला लखनऊला सोडण्याचे शासनाचे आदेश असल्याचे सांगितले. मग आम्ही लखनऊतून रेल्वेने दिल्लीला पोहोचलो. अशा प्रकारे पहिली कारसेवा संपुष्टात आली.

१९९२ मध्ये ज्या वेळेस दुसरी कारसेवा सुरू झाली, त्या वेळेस त्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मी स्वत: दिल्ली येथे नॉर्थ अव्हेन्यूमध्ये कार्यकर्त्यांची जमवाजमव करून संमेलन घेऊन त्यांना दुसऱ्या कारसेवेमध्ये भाग घेण्यास तयार केले. डिसेंबर १९९२ रोजी आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी अयोध्येकडे रवाना झालो. पहिल्या कारसेवेच्या वेळेस अनेक अडचणी त्या वेळचे मुख्यमंत्री मुलायमसिंग सरकारने निर्माण केल्या होत्या. त्याप्रकारे कुठल्याही प्रकारच्या अडचणी किंवा अडथळ्यांना या वेळेस आम्हाला तोंड द्यावे लागले नाही. त्या वेळेस उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार होते. भाजपचे कल्याणसिंह हे मुख्यमंत्री होते. आम्ही सर्व मंडळी अयोध्येमध्ये जाऊन पोहोचलो. साधारण दुपारी १२ ते च्या दरम्यान काही मंडळींनी बाबरी मशिदीवर चढण्यास सुरुवात केली. बाबरी मशिदीचे एकंदर तीन घुमट होते. ते प्रचंड मोठे होते. त्यावर चढणे तितके सोपे नव्हते. काही लोकांच्या हातात निरनिराळ्या प्रकारची खोदकामाची हत्यारे होते. त्यांनी लगेच तोडफोडीला सुरुवात केली. हे सर्व चालू असताना अडवाणी मुरली मनोहर जोशी ही मंडळी जवळच्याच एका छतावर स्थानापन्न झाली होती. हे कार्य चालू असताना शासकीय यंत्रणा तेथे उपस्थित होती, पुढे चालून चार राज्यांतील भाजपशासित सरकारे बरखास्त करण्यात आली. असे दोन कारसेवांचे दोन अनुभव होते.
बातम्या आणखी आहेत...