आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादचे माजी खासदार आणि सवेरा उद्योग समूहाचे अध्यक्ष मोरेश्वर दीनानाथ सावे (८५) यांचे गुरुवारी दुपारी ३.३० वाजता निधन झाले. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात अनिल, अजित, भाजप आमदार अतुल मुलगी अंजली असा परिवार आहे.
सावे यांचा जन्म फेब्रुवारी १९३१ राेजी ठाणे जिल्हातील चिंचणी येथे झाला होता. सावे १९८८ मध्ये नगरसेवक आणि १९८९ राेजी महापौर बनले होते. ते १९८९-१९९१ १९९१ ते १९९६ या काळात औरंगाबादचे खासदार होते. सीएमआय, औरंगाबाद बुद्धीबळ संघटना मराठवाडा सिनेमा एक्झिबीटर्स असोशिएनच्या अध्यक्षपदासह त्यांनी अनेक पदे त्यांनी भूषवली.

सच्चा माणूस : प्रभू
^अण्णांचेजाणे क्लेशदायी आहे. मोरेश्वर सावे यांचा-माझा खूप जुना ऋणानुबंध होता. सारस्वत बँकेचा अध्यक्ष असताना तो अधिक दृढ झाला. त्यांच्यासारखा सच्चा माणूस विरळाच. त्यांनी काटेकोरपणा अंगी बाणवला. त्याप्रमाणेच ते जगले. सावेंनी विकासाची दृष्टी असलेला अभ्यासू राजकारणी म्हणून काम केले. -सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री