आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam Cantroller Dr Chavan Angru On Court Commeti In Investigation

परीक्षा नियंत्रक डॉ. चव्हाण यांची आगपाखड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी चौकशीदरम्यान परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक न्यायालयीन समितीच्या (32/6) सदस्यांवर आगपाखड केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अभियांत्रिकी पेपरफुटीप्रकरणी समितीने शुक्रवारी त्यांची चौकशी केली. मात्र, माध्यमांत बातम्या कशा काय प्रसिद्ध होतात, असा उलट सवाल करून त्यांनी सदस्यांनाच धारेवर धरले.
अभियांत्रिकीच्या गणित विषयाच्या पेपरफुटीप्रकरणी 32/6 समितीकडे कृती अहवाल सादर करण्याचे काम कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी सोपवले आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीने तसा प्रस्ताव मंजूर करून डॉ. रत्नदीप देशमुख सत्यशोधन समितीचा अहवाल सुपूर्द केला. त्यानुसार शुक्रवारी परीक्षा नियंत्रक डॉ. चव्हाण आणि विद्यापीठाचे तंत्रज्ञ राजपूत यांची कसून चौकशी केली. मात्र, स्थानिक वर्तमानपत्रांत यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे चव्हाण यांनी समितीच्या सदस्यांवरच दोषारोप करून आगपाखड केली. सदस्यांशिवाय बातम्या बाहेर जातातच कशा, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. या चौकशीसंबंधी वृत्त आल्यास तुमचे काही खरे नाही, असे बजावण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे डॉ. चव्हाण यांची दुपारी बंदद्वार चौकशी करण्यात आली. चौकशीसंबंधी माहिती बाहेर येऊ नये म्हणून चोख बंदोबस्त करण्यात आला होता. या संदर्भात चौकशी समितीच्या एकाही सदस्याने ब्रसुद्धा काढला नाही. सदस्यांनी आपापली मते मांडली असून सर्वांचा एकत्रित अहवाल कुलगुरूंना लवकरच सादर केला जाणार आहे. पेपरफुटीदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. असे कारण डॉ. चव्हाण यांनी पुढे केले. तसेच परीक्षा नियंत्रक म्हणून मी काहीच गलथानपणा केला नाही, असा दावा चौकशी समितीपुढे केल्याचे वृत्त समजले.